‘बिग बॉस ओटीटी सीझन 4’चा कोण असणार होस्ट? सलमान ऐवजी ‘या’ दोन कलाकरांची नावे चर्चेत

Bigg boss OTT 4 | अभिनेता सलमान खानच्या बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या पुढील सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता बिग बॉसचा चौथा सीझन ओटीटीवर येणार आहे. परंतु ओटीटीच्या या सीझनमध्ये सलमान खान होस्ट म्हणून दिसणार नाही. त्यामुळे हा शो कोण होस्ट करणार याची सध्या चर्चा रंगली आहे. यासाठी आता दोन कलाकारांची नावे समोर येत आहे.
बिग बॉस ओटीटीचा पहिल्या सीझन चित्रपट निर्माते करण जोहर यांनी होस्ट केले होते. त्यानंतर, दुसऱ्या सीझनमध्ये सलमान खान परतला. त्यानंतर, तिसऱ्या सीझन अनिल कपूर दिसले. आता येणाऱ्या सीझनच्या होस्टबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. आता चौथा सीझनसाठी सलमान खान व्यतिरिक्त, शोच्या होस्टसाठी रोहित शेट्टी आणि सोनू सूद यांची नाव समोर आली आहेत.
असे म्हटले जात आहे की, निर्मात्यांनी रोहित शेट्टीला त्याच्या होस्ट म्हणून बोलावण्यात येत आहे, याशिवाय सोनू सूदला देखील ही ऑफर देण्यात आली आहे, परंतु आतापर्यंत दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद आलेला नाही. Bigg boss OTT 4 |
दरम्यान, रोहित शेट्टी आणि सोनू सूद दोघांनीही टीव्ही शो होस्ट केले आहेत. बिग बॉस ओटीटीच्या सीझनची पहिली विजेती दिव्या अग्रवाल होती, दुसऱ्या सीझनमध्ये एल्विश यादव आणि तिसऱ्या सीझनमध्ये सना मकबूलने हे विजेतेपद जिंकले होते. तर बिग बॉस सीझन 18 चा करणवीर मेहरा विजेता ठरला. Bigg boss OTT 4 |
हेही वाचा :





