संघर्ष कोणाला चुकलाय! तब्बल 9 वर्ष स्ट्रगल, ७९ वेळा रिजेक्शन; हा स्टारकिड्स लवकरच करणार सिनेमा इंडस्ट्रीत पदार्पण

Yashvardhan Ahuja | फिल्म इंडस्ट्रीत काम मिळण्यासाठी अनेक कलाकारांना मोठ्या संघार्षाचा सामाना करावा लागतो. स्टारकिडसलाही इंडस्ट्रीत येण्यासाठी संघर्षाचा सामना हा करावाचा लागतो. अशीच मेहनत करत बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी एक स्टारकिड आता सज्ज झाला आहे. हा स्टारकिड्स गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा आहे.
अनेक स्टारकिड्सना सगळं आयत मिळत, पण यशवर्धन याला सिमेमात काम मिळवण्यासाठी मोठ्या संघर्षाचा सामाना केला आहे. तब्बल नऊ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्याला बॅालीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. यशवर्धन राष्ट्रीय पुरस्कार विजेते साई राजेश यांच्या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे
यशवर्धनने नऊ वर्षांत ७९ वेळा अॅाडिशन्स दिल्या आहेत. पण त्याला सगळीकडून नकार मिळत गेला. पण त्याने हार मानली नाही. अखेर त्याला नशीबाची साथ मिळाली. साई यांच्या एका सिनेमासाठी त्याला कास्ट करण्यात आलं आहे. या सिनेमाच नाव समजू शकलेलं नसलं तरी लवकरच या सिनेमावर काम करायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे गोविंदाचा मुलगा यशवर्धन याच्या सिनेमातील पदार्पणाच्या चाहते मंडळी आतुरतेनं वाट पाहत आहेत.
मी गेल्या नऊ वर्षांपासून ऑडिशन देत आहे. पण प्रत्येक वेळी माझ्या पदरी नकारच मिळाला. अनेकदा ऑडिशन दिलं आणि त्यानंतरच मला हे संधी मिळाली आहे. मी नऊ वर्षांपासून तयारी करत होतो आणि अनेकदा नाकारण्यात आल्यानंतर आता मी बॉलीवूडमध्ये येण्यास सज्ज झालो आहे, असे यशवर्धन आहुजाने एका वाहिनीला मुलाखती देतेवेळी म्हटले आहे.
प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास असतो. मी त्यांना कधीही स्क्रिप्ट पाठ करताना पाहिलं नाही. त्यांची स्मरणशक्ती खूप भारी आहे. त्यांचं टायमिंगही एकदम उत्तम आहे. डान्स आणि विनोदाच्या टायमिंगमध्ये त्यांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांना पाहून मी खूप काही शिकलो आहे, अशी भावना यशवर्धनने आपले वडील गोविंदा यांच्याबद्दल व्यक्त केली.





