हा हा हाहा कौन राहुल? ये है राहुल.! फोटो शेअर करत संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर खोचक टीका

Sanjay Raut | Rahul Gandhi | Narendra Modi : लोकसभा अध्यक्षपदावरून सरकार आणि विरोधकांमध्ये सुरू असलेला वाद आज संपुष्टात आला आहे. कारण भाजप खासदार ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांची निवड आवाजी मतदानाने झाली आहे. त्यांच्या विरोधात विरोधीपक्षाकडून इंडिया ब्लॉक के. सुरेश यांना उमेदवारी दिली होती.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ओम बिर्ला यांची कनिष्ठ सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्यानंतर लालन सिंह, जीतन राम मांझी, अमित शाह, चिराग पासवान, एचडी कुमारस्वामी आणि किंजरापू राम मोहन नायडू यांनीही ओम बिर्ला यांना कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवडण्याचा प्रस्ताव मांडला होता. दरम्यान, यानंतर त्यांची आवाजी मतदानाने अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ओम बिर्ला यांची 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या आसनापर्यंत पोहचवले. संपूर्ण सभागृहाने त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. ओम बिर्ला यांच्या असणापर्यंत पोहोचल्यावर प्रोटेम स्पीकर भर्त्रीहरी महताब यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, यावेळचा राहुल गांधी यांचा फोटो उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “हा हा हाहा कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
हा हा हाहा
कौन राहुल?
ये है राहुल!
ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?@RahulGandhi @BJP4India pic.twitter.com/FFbzQditKS— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2024
पंतप्रधान मोदींकडून अध्यक्षांचे अभिनंदन
ओम बिर्ला यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘तुम्ही दुसऱ्यांदा या जागेवर विराजमान आहात हे सभागृहाचे भाग्य आहे. माझ्याकडून आणि या संपूर्ण सभागृहाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अमृतकालच्या या महत्त्वाच्या काळात दुसऱ्यांदा हे पद सांभाळण्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आली आहे, येत्या ५ वर्षांत तुम्ही आम्हा सर्वांना मार्गदर्शन कराल.





