बिल गेट्सची नवीन गर्लफ्रेंड कोण आहे? एका वर्षापासून एकमेकांना करताहेत डेट, फोटोमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे सध्या 60 वर्षीय पॉला हर्डसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. पीपल मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार, 67 वर्षीय गेट्स आयटी कंपनी ओरॅकलचे माजी सीईओ मार्क हर्ड यांच्या विधवा पत्नी पॉला हर्डला डेट करत आहेत.
कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये मार्क हर्डचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 मध्ये बिल गेट्सने मेलिंडा फ्रेंच गेट्सला घटस्फोट दिला, त्यानंतर आता ते पॉला हर्डला डेट करत आहे.
पॉला हर्ड इव्हेंट प्लॅनर म्हणून काम करते. ती नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या कंपनीत काम करते. त्यांना कॅथरीन आणि कॅली या 2 मुली आहेत. मार्क हर्डने तिच्यासाठी सुमारे $500 दशलक्ष किमतीची मालमत्ता सोडली होती. पॉला यांनी टेक्सास विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनाचे शिक्षण घेतले आहे.
पॉला आणि बिल ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दिसले होते एकत्र –
टेनिसप्रेमी गेट्स आणि पॉला गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकत्र दिसले होते. मार्च 2022 मध्ये इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या WTA सेमीफायनल मॅचमध्ये दोघेही एकत्र बसलेले दिसले होते. गेट्स आणि पॉला गेल्या एक वर्षापासून डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिन्यात सिडनी येथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि गेट्स यांच्या भेटीदरम्यान पॉलाही उपस्थित होती.





