Medhavi Bidhuri Viral : कोण आहे मेधवी बिधुरी? विकेट्स घेताच अनोख्या ‘६-७’ सेलिब्रेशनमुळे रातोरात बनलीय ‘नॅशनल क्रश’, पाहा VIDEO
Medhavi Bidhuri Viral : फिरकीपटू मेधवी बिधुरीने प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेल्या अनोख्या '६-७' (6-7) सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Who Is Medhavi Bidhuri Viral 6-7 Celebration Video WDPL 2026 Internet Sensation : वुमेन्स दिल्ली प्रीमियर लीग २०२६ (WDPL 2026) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातून एक नवी युवा खेळाडू सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली आहे. सेंट्रल दिल्ली क्वीन्स संघाकडून खेळताना फिरकीपटू मेधवी बिधुरीने (Medhavi Bidhuri) प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्यानंतर केलेल्या अनोख्या ‘६-७’ (6-7) सेलिब्रेशनचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या हटके जल्लोषामुळे आणि आकर्षक लूकमुळे नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियाची नवी ‘नॅशनल क्रश’ घोषित केले आहे.
चार षटकांत दोन विकेट्स; निशिका सिंगला बाद करताच केला भन्नाट डान्स!
साउथ दिल्ली सुपरस्टार्स आणि सेंट्रल दिल्ली क्वीन्स यांच्यात झालेल्या या रोमांचक सामन्यात साउथ दिल्लीने विजयासाठी १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट्रल दिल्लीच्या संघाला २० षटकांत ७ बाद १२७ धावाच करता आल्या. सामना गमावला असला तरी मेधवीने आपल्या उत्कृष्ट लेग-स्पिनच्या जोरावर ४ षटकांत अवघ्या २४ धावा देत २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. तिने निशिका सिंगची दांडी उडवल्यानंतर हात वर-खाली हलवत एक वेगळाच ‘६-७’ असा डान्स करत जल्लोष केला, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जर्सी क्रमांक ६७ अन् Gen-Z ट्रेंड; मेधवीने उलगडले सेलिब्रेशनचे गुपित!
Absolute queen behaviour 🫰
Central Delhi Queens’ Medhavi Bidhuri stole the show with a sensational 2/24 against South Delhi Superstarz! 😍
Watch Women’s Delhi Premier League 2026 | LIVE on Star Sports & JioHotstar! pic.twitter.com/TeJG5fstGV
— Star Sports (@StarSportsIndia) August 21, 2026
सामन्यानंतर मेधवीने या अनोख्या सेलिब्रेशनमागील रंजक कहाणी सांगितली. “मला सुरुवातीला १२ क्रमांकाची जर्सी हवी होती, पण तो नंबर दुसऱ्या खेळाडूकडे गेला. त्यानंतर माझ्या धाकट्या बहिणीने, जी ‘जनरेशन-झेड’ (Gen-Z) पिढीची आहे, तिने मला ६७ नंबर निवडण्याचा सल्ला दिला. ‘६-७’ हा क्रमांक सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असल्याने मी तो जर्सी क्रमांक घेतला आणि विकेट मिळाल्यावर असा खास डान्स करण्याचे ठरवले होते,” असा खुलासा तिने केला.
कोण आहे मेधवी बिधुरी? पाहा तिची क्रिकेट कारकीर्द!
Meet Medhavi Bidhuri
Genz cricketer 🏏 Jersey no. 67
>She went famous for her trending celebration 💃
>She comes as a package > She is cute
>She is cricketer
>She wears yellow jersey 🟡 pic.twitter.com/kBGZItEdj9— Kiara (@Kiara_X_X1) August 21, 2026
New national crush unlocked in women’s cricket.
Meet Medhavi Bidhuri — an all-rounder and leg-spinner who has already become one of the cutest women cricketers ever. 😍 pic.twitter.com/xNl4VT8kvu
— Sonu (@Cricket_live247) August 21, 2026
मेधवी बिधुरी ही दिल्लीची उदयोन्मुख उजव्या हाताची लेग-स्पिनर (Leg-Spinner) आहे. ती गेल्या काही काळापासून दिल्लीच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. तिने आतापर्यंत खेळलेल्या ११ टी-२० सामन्यांत ६.६८ च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने ११ बळी मिळवले असून, २० धावांत ३ बळी ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२५ मध्ये साउथ दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळल्यानंतर २०२६ च्या मोसमात ती सेंट्रल दिल्ली क्वीन्सकडून आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे.





