इंदुरीकर महाराजांना भीती कुणाची? कार्यक्रमात मोबाईलसह कॅमेरावर बंदी

मुंबई – इंदुरीकर महाराज नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणातील घडामोडीवर आपल्या कीर्तनातून लोकांना सल्ला दिला होता. त्यांच्या एक ना अनेक वादग्रस्त विधान व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. या विधानांमुळे ते जरी चर्चेत असले तरी त्यांच्यावर यावरून टीकाही केली जाते.
त्यामुळे आता इंदुरीकर महाराज यांनी कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल होऊन आपल्या कुठलीही टीका होऊ नये यासाठी त्यांनी कार्यक्रमासाठी नियम काढला आहे. आपल्या शब्द कुठल्याही कॅमेरात किंवा मोबाईलमध्ये टिपल्या जाऊ नये यासाठी इंदूरिकर महाराजांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कॅमेरे आणि मोबाईलवर कार्यक्रमात बंदी घातली त्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात केली. इंदुरिकर महाराज कीर्तन करताना आपल्या शैलीतून अनेकांचा समाचार घेतात. सध्या गौतमी पाटील हिने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात धुडगूस घातला आहे. इंदूरिकर महाराजांनी देखील एका कार्यक्रमात गौतमी पाटील हीचा समाचार घेत टीका केली होती.
तत्पूर्वी, आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील हिची लोकप्रियता दिवसेंदिवस आणखीच वाढत आहे. गौतमीची प्रसिद्धी इतकी जास्त वाढली आहे की, कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी देखील गौतमीवर भाष्य केल होत. इंदुरीकर महाराज म्हणाले होते “कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तिची लाख रुपये देऊन तीनच गाणी ऐकतात तसेच गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला मात्र संरक्षण नसतं”. असेही ते म्हणाले होते.





