Rahul Gandhi । काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेतील वादग्रस्त मुस्लिम खासदार इल्हान उमरची भेट घेतली. या भेटीबाबत सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. इल्हान अनेकदा भारतविरोधी वक्तव्ये करते. अशातच आता सोशल मीडियावर कोणता अमेरिकन खासदार भारतविरोधी बोलतो? इल्हान उमर या महिला खासदार कोण आहे असे प्रश्न चर्चेत आले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे कट्टर समर्थक इल्हान उमर या भारतविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. इल्हानने भारतविरोधी घोषणाही दिल्या होत्या. एवढेच नाही तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरलाही भेट दिली. पीओकेमध्ये भारताविरोधात बरीच वक्तव्ये केली. अनेकदा हिंदूफोबियाबाबत वादग्रस्त विधानांनेही इल्हानचे चर्चेत आले आहे. Rahul Gandhi । पीएम मोदींच्या भाषणाचा निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केलेल्या अधिवेशनावर इल्हान उमरने बहिष्कार टाकला होता. पीएम मोदी अधिकृत दौऱ्यावर अमेरिकेला पोहोचले होते. त्यावेळी इल्हान म्हणाली होती की, ‘मी पंतप्रधान मोदींच्या भाषणाला विरोध करत आहे कारण भारत सरकारचे अल्पसंख्याकांबद्दलचे वागणे चांगले नाही. भारत सरकार हिंदू आणि राष्ट्रवादी गटांना पाठिंबा देते.’ अशात आता राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन खासदारांच्या गटाची भेट घेतली. यादरम्यान इल्हानही तेथे पोहोचली होती. Rahul Gandhi । निज्जर प्रकरणात अमेरिकन सरकारकडे ही मागणी करण्यात आली होती इल्हान उमर भारतासंदर्भात वादग्रस्त विधानेच करत नाही तर अनेकदा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये उडी घेते आणि त्यामुळेच भारत सरकारसोबत अनेकदा तिचे वाद होतात. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडामधील राजनैतिक वादावरही इल्हान बोलली होती. खलिस्तान समर्थक दहशतवादी हरदीप सिंह निज्जर यांच्या हत्येप्रकरणी इल्हानने ट्विटरवर अमेरिकेच्या बायडेन सरकारला कॅनडाच्या जस्टिन ट्रूडो सरकारला पाठिंबा देण्यास सांगितले होते. इल्हानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, कॅनडाचे नागरिक हरदीप सिंह निज्जर यांची भारत सरकारने हत्या केली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे. या तपासात अमेरिकेने कॅनडाला मदत करणे आवश्यक आहे’ . Rahul Gandhi । शाहबाज शरीफ आणि इम्रान खान यांची भेट घेतली होती इल्हान उमरच्या पीओके भेटीला भारताने विरोध केला होता, जिथे तिने शेहबाज शरीफ आणि इम्रान खान यांची भेट घेतली आणि इस्लामोफोबियावर चर्चा केली. पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादाला एकप्रकारे राजकीय पाठबळ म्हणून या बैठकीकडे पाहिले जात होते.