पुणे : शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याने पोलिसांच्या कारवाईला चकवा देत थेट लंडनमध्ये पळ काढला आहे. त्याच्यावर सन २००१ पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला हा महत्वाचा प्रश्न आहे. या प्रकरणी पुणे पोलीस चौकशी करणार असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान घायवळ याच्या मालकीच्या तीन दुचाकी आणि एक स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली आहे. घायवळ लंडन येथे स्थायिक झाल्यावर पुणे पोलिसांनी शिक्का मोर्तब केले आहे. त्याने मोक्का लागताच पलायण केले. लंडणमध्ये त्याची मोठी संपत्ती असल्याचे उघड झाले आहे. मोक्का लागताच पोलीस घायवळचा शोध घेत होते. तेव्हा पोलिसांना घायवळने पलायण केल्याचे समजले. दरम्यान घायवळच्या पुणे शहरात कोण कोणत्या ठिकाणी प्रॉपर्टी आहेत, याचा पोलीस शोध घेत आहेत. बंडू आंदेकर प्रमाणेच घायवळचीही प्रॉपर्टी जप्त करण्यात येणार आहे. ..आपल्या टोळीची दहशत कमी होतेय कोथरुड येथील गोळीबार आणि हल्ला प्रकरणात अटकेत असलेल्या ४ आरोपींची पुणे पोलिसांनी कसून चौकशी केली. या चौकशीत थेट निलेश घायवळ याचा संबंध पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात निलेश घायवळ सह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात एकूण १० आरोपी झाले आहेत. तर घायवळ टोळीवर मोक्का देखील लावण्यात आला आहे. दरम्यान, आपल्या टोळीची दहशत कमी होत असल्याने निलेश घायवळ यांनी टोळीतील सदस्यांना चिथावणी दिल्याचं पोलीस तपासात समोर आल आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणातील संबंधित आरोपींना पिस्तुल निलेश घायवळकडून देण्यात आले होते. ‘आपली दहशत कमी होत चालली आहे, पैसा मिळत नाही, त्यामुळे धाक निर्माण करा’, अशी चिथावानी निलेश घायवळ कडून देण्यात आली होती.