पद्म पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातून कोणाचे नाव सुचवाल? वाचकांनी सुचवली ‘ही’ तीन नावं
Updated On:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी नावं सुचविण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर डिजिटल प्रभाततर्फे महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारांसाठी कोणाचे नाव सुचवाल? असे जनमत घेण्यात आले. या जनमत चाचणीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद आला आहे.
डिजिटल प्रभातच्या वाचकांनी या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या दातृत्वासाठी जगभरामध्ये ओळखले जाणारे व करोना काळात मोठी मदत केलेले रतन टाटा, करोना महासाथीमुळे अडचणीत आलेल्या अनेकांना मदत करणारा खऱ्या आयुष्यातील ‘हिरो’ सोनू सूद व कोव्हीड सेंटर उभारून रुग्णसेवा देणारे आमदार निलेश लंके यांच्या नावांना विशेष पसंती दिली आहे.
महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारांसाठी तुम्हाला इतर कोणाचे नाव सुचवायचे असल्यास खालील फेसबुक लिंकवर भेट देऊन कमेंट्स बॉक्समध्ये आपले मत नक्की नोंदवा.
लिंक –





