Santosh Deshmukh Murder Case | राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण चांगलेच तापलेले आहे. या प्रकरणाचा आरोप असलेले वाल्मीक कराड 22 दिवसांनंतर पोलिसांच्या शरण आला. कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकिटवर्तीय आहेत. त्यामुळे विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावर मंत्री धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच माध्यमांसोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी बोलताना मांडली. मात्र वाल्मिक कराड जरी शरण आला असला तरी अद्याप या प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. आता CID संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधात आहे. मात्र सुदर्शन घुले कोण आहे? त्याची पार्श्वभूमी काय? हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे. तीन आरोपी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत या प्रकरणातील वाल्मिक कराड, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतिक घुले हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषीत केले आहे. यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे अशी फरार आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रसिद्धपत्रक जाहीर करत आरोपींना फरार घोषित केले आहे. आरोपींची माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देखील देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी वाल्मिक कराडसाठी काम करत असल्याचे म्हटले जात आहे. सुदर्शन घुले कोण ? सुदर्शन घुले बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचा आहे. त्याचं शिक्षण झालं सातवीपर्यंत झाले आहे. तो 27 वर्षांचा आहे. सुदर्शन घुले हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच तो उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून वसुली करायचा. राजकीय नेत्यांच्या संपर्कात राहुन घुले मोठा झाल्याचं सांगण्यात येत आहे. एकुलता एक असलेला सुदर्शनच्या वडिलांचा मृत्यू झाला असून घरी फक्त त्याची आई असते. त्यांची 2 ते 4 चार एकर कोरडवाहू जमीन आहे. सुदर्शन घुलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण केल्याचा गुन्ह्याची याआधी नोंद आहे. 10 वर्षात त्याच्यावर 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षामध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. सुदर्शन घुले नेपाळला लपल्याची शक्यता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सात पथके विविध राज्यासह देशभरात रवाना करण्यात आली आहेत. सुदर्शन घुले हा सराईत गुन्हेगार असून तो यापूर्वी नेपाळला जाऊन आल्याने तो पुन्हा तेथे लपल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सीआयडीची पथकाकडून सध्या सुदर्शन घुलेचा कसून शोध घेतला जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? समोर आलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवनचक्की परिसरात सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी राडा केला होता. यावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे पवनचक्की अधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. याचा सुदर्शन घुलेला राग आल्याने त्याने त्याच्या ६ साथीदारांनी संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केल्याचे म्हंटले जाते. या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सुदर्शन घुलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणानंतर ११ डिसेंबर रोजी पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदे यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. सुदर्शन घुले या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. हेही वाचा: HMPV Virus : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा उद्रेक ; संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान