Rohit Pawar : ‘देवाभाऊ’ म्हणत कोट्यावधींच्या निनामी जाहिराती नेमक्या कुणी दिल्या? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले “भाजपने नाहीतर…”

Rohit Pawar : मराठा आरक्षणावर सरकारने जीआर काढत हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे मनोज जरांगे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेलं आझाद मैदानावरील आमरण उपोषण थांबवण्याचा निर्णय समाजबांधवांसोबत चर्चा करून घेतला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख असलेल्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
नुकतेच अनंत चतुर्देशीच्या मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वच दैनिकांमध्ये देवाभाऊ असा उल्लेख असलेली जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करताना दिसत आहेत. मात्र, या जाहिरात कोणी दिली याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला नाही.
यामुळे या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या जाहिराती एका मंत्र्यांना दिल्याचं म्हटलं आहे. याशिवाय जाहिरावरून त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी याविषयी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे.
एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.
तसेच या जाहिराती भाजपचा नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने दिल्या असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चावरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता.
रोहित पवारांचा दावा
या कोट्यावधी रुपयांच्या जाहिरातीबद्दल अधिक माहिती घेतली असता या जाहिराती देवेंद्र फडणवीस साहेबांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्याने परस्पर दिल्या असल्याचे समजले आणि विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपाचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असे देखील कळत आहे, असा दावा त्यांनी या पोस्टमधून केला आहे.
एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस… pic.twitter.com/IpLZjm8DUv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2025
या पोस्टमध्ये पुढे ते म्हणाले, मला मिळालेली माहिती खरी असेल तर मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील.





