Rashmika Mandanna : नॅशनल क्रशच ठरलं? साखरपुडा गुपचूप उरकल्याची चर्चा; बोटातली ती अंगठी ठरतेय कारण, Video पाहा…

Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना हि तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा असल्याने तिच्या रिलेटेड गोष्टी जाणून घेण्यास त्यांना खूप उत्सुकता असते. नुकताच रश्मिकाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तिचं ठरलं असून, तिचा साखरपुडा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. या व्हिडीओत रश्मिकाच्या डाव्या हाताच्या एका बोटात साखरपुड्याची अंगठी घातलेली दिसत आहे.
एअरपोर्टवर कारमधून उतरताना आणि बसताना रश्मिकाची अंंगठी कॅमेरात कैद झाली आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. साऊथ सिनेमातील आघाडीचा अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत रश्मिकाच नाव जोडलं जात असून, हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच दोघेही आगामी सिनेमात एकत्र दिसणार असल्याने दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
View this post on Instagram
गेल्या काही काळापासून विजय आणि रश्मिका यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत आहेत. अनेकवेळा हे दोघेही एकत्र स्पॅाट झाले आहेत. तसेच त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. दोघांनीही अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. प्रेक्षकांनीही रश्मिका-विजय यांच्या अॅानस्क्रिन जोडीला चांगला प्रतिसाद दिला आहे.
दोघांनी गिता गोविंदम नावाच्या सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा खूप गाजला होता. या दोघांच्या अॅानस्क्रिन जोडीने प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यानंतर दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं. मात्र, आपल्या नात्यावर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा : पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची विसर्जन मिरवणूक लवकर संपली; गेल्या वर्षी लागले होते इतके तास





