Akshaye Khanna : ‘धुरंधर’ चित्रपटातील अभिनेता अक्षय खन्नाच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर अक्षय खन्नाने आपल्या आगामी ‘महाकाली’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात तो ‘असुर गुरु’ शुक्राचार्यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. महाकाली हा प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा एक भाग आहे. विशेष म्हणजे, या भूमिकेसाठी त्याचा लूक पूर्णपणे बदलण्यात आला असून, तो एका ऋषी-मुनींसारखा दिसणार आहे. लांब पांढरी दाढी, केस आणि पारंपरिक वेशभूषेमुळे त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. नुकताच त्याचा ‘फर्स्ट लूक’ प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. Akshaye Khanna या चित्रपटाचे सुमारे ४० दिवसांचे शूटिंग बाकी असून, ते हैदराबादमध्ये पूर्ण होणार आहे. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. Akshaye Khanna दरम्यान, पूजा अपर्णा कोल्लुरु दिग्दर्शित ‘महाकाली’मध्ये भूमी शेट्टी मुख्य भूमिकेत आहे ‘महाकाली’च्या माध्यमातून अक्षय खन्ना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘धुरंधर’नंतर अक्षय खन्नाच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबतही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. Akshaye Khanna हेही वाचा: Top 10 News: तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश, रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात आणि लोकप्रिय अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, वाचा अशा टॉप १० बातम्या