Shiv Sena Symbol : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी व्हीप लागू होत नाही; शिंदे गटाचा युक्तिवाद
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.

Shiv Sena Symbol : पक्षाचे नेतृत्व दहाव्या अनुसूचीतील तरतुदींचा वापर करून अपात्रतेची धमकी देऊन सदस्यांमधील सामूहिक असहमतीला दाबण्यासाठी करू शकत नाही. तसेच प्रतिस्पर्धी नेत्यांमधील नेतृत्वासाठीचा संघर्ष ही पूर्णपणे पक्षांतर्गत बाब आहे, ज्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची कोणतीही भूमिका नसते. (Shiv Sena Symbol)
तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी व्हीप लागतच नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकिल ध्रुव मेहता यांनी केला. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी पार पडली. (Shiv Sena Symbol)
शिंदे गटाच्या वतीने वकील ध्रुव मेहता यांनी आज व्हिपच्या उल्लंघनाच्या मुद्द्यावर अधिक जोर दिला. आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हिपचे उल्लंघन केल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. (Shiv Sena Symbol)
ध्रुव मेहता यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम यांनी व्हिप मिळाला नसल्याचे सांगितले होते. विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांचे नाव चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि संग्राम थोपटे (काँग्रेस) यांनी सुचवले होते. (Shiv Sena Symbol)
भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हिप महत्त्वाचा होता. त्यांना (गोगावले यांना) अध्यक्षांनी व्हिप म्हणून मान्यता दिली होती. भरत गोगावले यांना 3 जुलै रोजी अध्यक्षांनी व्हिप म्हणून मान्यता दिली आहे. यावर आमचे वकील मनिंदर सिंग आणि नीरज किशन कौल यांनी सविस्तर युक्तिवाद केला आहे, असे ते म्हणाले. (Shiv Sena Symbol)
तसेच विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. विधानसभा अध्यक्ष ही स्वतंत्र लवाद आहे आणि त्यांना 10 व्या शेड्यूल नुसार संपूर्ण अधिकार आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. (Shiv Sena Symbol)
नोव्हेंबर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला, तो शिवसेनेच्या मूळ वैचारिक भूमिकेपासून दूर जाणारा होता. (Shiv Sena Symbol)
यानंतर जून २०२२ मध्ये ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले, त्यांनी शिवसेना सोडली नव्हती. उलट, ते पक्षाची मूळ वैचारिक ओळख आणि राजकीय दिशा पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा त्यांनी केला. (Shiv Sena Symbol)





