Jackie Shroff : बॅालीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॅाफ आणि धकधक गर्ल माधुरी दिक्षित या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि चित्रपटही हिट ठरले. या दोघांनी काही रोमँटिक सीन्स देखील दिले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता जॅकी श्रॅाफने सुरुवातीला माधुरीसोबत काम करताना लाजलो होतो, असा खुलासा केला आहे. “माधुरीसोबत रोमँटिक सीन्स करताना मला लाज वाटायची. मला या सगळ्याची सवय नव्हती,” असे जॅकी श्रॅाफने सांगितले. या दोन प्रसिद्ध कलाकारांनी एकत्रित काम केलेले खलनायक, राम लखन हे चित्रपट विशेष गाजले. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते अजूनही इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि त्यांनी ओटीटीवरही पदार्पण केले आहे. मोठे सुपरस्टार असूनही, जॅकी श्रॉफ इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळे आहेत. ते खूप लाजाळू स्वभावाचे होते, हे त्यांनी अनेक मुलाखतीत स्पष्ट केले आहे. सुभाष घई दिग्दर्शित कर्मा चित्रपटात माधुरी आणि जॅकी श्रॅाफ झळकले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक किस्सा अभिनेत्याने शेअर केला. यावर बोलताना जॅकी श्रॅाफ म्हणाला, “मी तिच्याबद्दल पहिल्यांदा सरोज खानकडून ऐकले. सुभाष घईंना सांगितले की माधुरी नावाची एक मुलगी इंडस्ट्रीमध्ये आली आहे; ती एक अतिशय सुंदर नायिका आणि एक उत्तम नर्तकी आहे.” सरोज खानने सुभाष घईंना सांगितले की त्यांनी माधुरीला कास्ट करावे आणि ती अजूनही तिच्या कामाची चाहती आहे. तसेच अभिनेत्याने माधुरीसोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला. “माधुरी दीक्षितने माझ्यासोबत सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि मला त्याबद्दल खूप आनंद आहे. माधुरीसोबत रोमँटिक सीन्स करताना मला लाज वाटायची. मला या सगळ्याची सवय नव्हती. चित्रपट वास्तविक जीवनावर आधारित असतात, काही भावना वैयक्तिक असतात. त्या हृदयात राहतात. तुम्ही त्या पडद्यावर कशा दाखवू शकता, असे अभिनेत्याने सांगितले. जेव्हा ती बोलते तेव्हा तिच्या डोळ्यात पाहताना बोलणे किंवा गाणे खूप कठीण असते.” असेही जॅकी श्रॅाफने सांगितले. हेही वाचा : Mrunal Thakur Emotional Post: “ती माझ्या सोबत असेल, तर…” मृणाल ठाकूरची बहिणीसाठी पोस्ट