Mrunal Thakur Emotional Post: “ती माझ्या सोबत असेल, तर…” मृणाल ठाकूरची बहिणीसाठी पोस्ट

Mrunal Thakur Emotional Post: अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिंदीसह साउथ सिनेसृष्टीत अप्रतिम अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या मृणाल आगामी ‘दो दीवाने शहर मे’ सिनेमामुळे चर्चेत आहे. यात ती अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत मुख्यभूमिकेत आहे. मात्र मृणालने तिच्या बहिणीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मृणालने पोस्टमध्ये लिहिले की, “ती फक्त माझी बहीण नाही, ती माझं गुप्त अस्त्र आहे. जगातील सर्वोत्तम मेकअप आर्टिस्ट आणि माझ्यामागे उभं असलेलं सर्वात मजबूत पाठबळ. ती माझ्या सोबत असेल, तर जादू होणं नक्कीच ठरलेलं आहे”. मृणालच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मृणालच्या बहिणीचं नाव लोचन ठाकूर असं आहे. लोचनने मृणालच्या काही चित्रपटांमध्ये हेअर आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. Mrunal Thakur Emotional Post:
मृणाल मुळची धुळ्याची आहे, त्यामुळे तिचं मराठीवर विशेष प्रेम आहे. इतकंच नाही तर मराठीसह तिचं खानदेशी भाषेवर विशेष प्रभुत्व आहे. अलीकडेच तिचा खानदेशी भाषेतील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तिचे खूप कौतुक करण्यात आले.
मृणाल ठाकूरने हिंदी, मराठी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘लव सोनिया’, ‘सुपर 30’, ‘बाटला हाऊस’, ‘जर्सी’ यासारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले आहे. Mrunal Thakur Emotional Post:
हेही वाचा:





