यातील खरा कोणता ? विमानतळावर दोन गोविंदा पाहून चाहते देखील गोंधळले Video viral

मुंबई – अनेक वर्ष झाली अभिनेता गोविंदा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. गेल्या ३ वर्षांमध्ये तो काही सिनेमांमध्ये केवळ गेस्ट अपिअरन्स पुरता दिसला होता. मोठ्या पडद्यावरून दूर गेल्यानंतर गोविंद काही रिऍलिटी शोमध्ये देखील दिसला. असं असलं तरी गोविंदाची फॅन फॉलोविंग काही कमी झालेली नाही. नुकताच गोविंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
गोविंदाचा व्हायरल होणारा व्हिडीओ चांगलाच मजेशीर आहे. एका विमानतळावरील हा व्हैडीओ असून यावेळी गोविंदासमोर थेट त्याचाच ड्युब्लिकेत आल्याचे पाहायला मिळाले. गोविंदा आणि सुनीता आहुजा एका प्रवासासाठी विमानतळावर पोहचले होते. त्यावेळी तिथे एक व्यक्ती आली जी गोविंदाच्या पाया पडली. ही व्यक्ती डिक्टो गोविंदाप्रमाणे दिसत असल्यामुळे सुनीता आहुजाला देखील नवल वाटले.
View this post on Instagram
या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहणाऱ्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे इतके दोघे सेम टू सेम वाटत आहेत. चाहत्यांनी यावर जोरदार कमेंटबाजी केली आहे. एका युजरने मेळ्यात हरवलेले भाऊ सापडला अशी कमेंट केली आहे तर दुसऱ्याने यातील खरा गोविंदा कोणता ? असा सवाल उपस्थित केला आहे.




