Where To Wach Live Streaming : तुम्ही घरी बसून एका क्लीकवर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पाहू शकाल; वाचा सविस्तर

22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला बघण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बडे नेते या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी अनेकांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. या कार्यक्रमात अनेक नेते, अभिनेते सहभागी होणार आहेत. तुम्हालाही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हायचे असेल, तर तुम्ही घरबसल्या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.
तुम्ही राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे लाईव्ह स्ट्रीमिंग पुढील स्टेप फॉलो करून पाहू शकता डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजवर Digital Prabhat तुम्हाला राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. त्याचबरोबर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाशी संबंधित अनेक बातम्या www.dainikprabhat.com डिजिटल प्रभात वेबसाईटवरही वाचता येतील.
अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर पाहू शकाल. कार्यक्रमाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. राम मंदिर कार्यक्रमाचे मेगा कव्हरेज 22 जानेवारीपासून डीडी नॅशनल आणि डीडी न्यूजवर सुरू होईल. यासोबतच 23 जानेवारी रोजी दूरदर्शनवर श्री राम मंदिरातून आरतीचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.





