Rahul Gandhi : “आई-वडिलांची पहिली भेट झाली, तेथे…” राहुल गांधी यांनी गर्लफ्रेंडचा उल्लेख करत पहिल्यांदा सांगितली ‘लव्ह स्टोरी’
Rahul Gandhi : सध्या राहुल गांधी यांची ही मैत्रिण कोण आहे? या चर्चांना सोशल मिडियावर उधाण

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोनिया गांधींच्या ‘बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्यांच्या गर्लफ्रेंडबाबत मोठा खुलासा केला आहे. राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच गर्लफ्रेंडचा उल्लेख करत त्यांच्या लव्हस्टोरीचा किस्सा सांगितल्याने सध्या यावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
केंब्रिजमध्ये शिक्षण घेताना राहुल गांधी यांनी आपल्या आई-वडिलांच्या प्रेमकहाणीशी जोडलेला एक खास प्रसंग यावेळी सांगितला. राजीव आणि सोनिया यांची पहिली भेट ब्रिटनमधील केंब्रिज येतील वर्सिटी रेस्टॉरंटमध्ये झाल्याचं सांगितलं. त्यानंतर अनेक वर्षानंतर आपण देखील आपल्या गर्लफ्रेंडसोबत त्याच रेस्टॉरंटमध्ये गेल्याचं ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी आई सोनिया गांधींच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणात केंब्रिज विद्यापीठातील दिवसांची आठवण सांगितली. केंब्रिजमध्ये शिक्षणासाठी गेले असताना त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला त्याच रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, जिथे त्यांच्या आई-वडिलांची पहिली भेट झाली होती. रेस्टॉरंटमध्ये पोहचल्यानंतर राहुल गांधी यांना तिथले पिवळ्या रंगाचे दार आजही आठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगाची आठवण सांगताना राहुल गांधी म्हणाले की, त्या रेस्टॉरंटच्या दरवाजाचा रंग पिवळा होता. दोघेही तिथे पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्यांनी किती जण आहात, अशी विचारणा केली. त्यावर राहुल यांनी ‘दो’ असे उत्तर दिले. त्यानंतर दोघांनी मेन्यू पाहून जेवणाची ऑर्डर दिली. यानंतर राहुल गांधी यांनी त्या कर्मचाऱ्याला सांगितले की, माझे आई-वडील याच रेस्टॉरंटमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावर त्या कर्मचाऱ्यानेही आश्चर्य व्यक्त केले.
#WATCH | Delhi: At the launch event of her mother and CPP Chairperson Sonia Gandhi’s memoir, ‘Belonging: A Journey of Love’, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “There was quite a lot of mythology about my parents. One of the big stories was about their meeting at the Varsity Restaurant. Many years later, I happened to be in Cambridge, and I told my girlfriend, “Let’s go to the Varsity Restaurant.” I wanted to see where my parents had met… I sat down. They brought the menu, and I said, “My parents met at this restaurant.” He just looked at me and said, “Oh, them, I know them.” And I was like, “What do you know about them?” He said, “Oh, those two. I know exactly who you’re talking about.”
(Source: Congress)
— ANI (@ANI) November 16, 2026
राहुल गांधी यांनी दोघांसाठी तोच पदार्थ मागवला, पण…
या रेस्टॉरंटमधील आणखी एक मजेशीर प्रसंग राहुल गांधी यांनी सांगितला. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला मेन्यूमधील चांगला पदार्थ कोणता, असे विचारले. त्यावर कर्मचाऱ्याने ‘चिकन चॅसर’ हा पदार्थ चांगला असल्याचे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी दोघांसाठी तोच पदार्थ मागवला.
मात्र, या पदार्थाची चव त्यांना फारशी आवडली नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या आई-वडिलांना या रेस्टॉरंटमधील जेवण खूप चांगले वाटत होते, पण स्वतःचा अनुभव सांगताना राहुल गांधी यांनी जेवण अजिबात चांगले नसल्याचे विनोदी शैलीत म्हटले. या विनोदी विधानामुळे कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, कार्यक्रमानंतर पत्रकारांनी राहुल गांधी यांना थेट प्रश्न विचारला की, तुमच्या भाषणात ज्या गर्लफ्रेंडचा उल्लेख केला, ती आता कुठे आहे? यावर ते म्हणाले, ‘ती आता माझी चांगली मैत्रीण आहे.’ त्यांनी त्या महिलेबाबत कोणतीही वैयक्तिक माहिती दिली नाही. मात्र सध्या राहुल गांधी यांची ही मैत्रिण कोण आहे?, या चर्चांना सोशल मिडियावर चांगलेच उधाण आले आहे.
हेही वाचा:





