Ajit Pawar : “दादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठ आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होतय का? कारण त्यांचे विचार ऐकुन आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे,” असे ट्वीट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले असून, मिटकरींना या ट्वीटमधून नेमकं काय म्हणायचं यावर अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या ट्वीटसोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत डिझाईन बॅाक्सचे नरेश अरोरा दिसत आहेत. या ट्वीटनंतर स्वतः अमोल मिटकरी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत ट्वीट करण्यामागचे कारणं सांगितले आहे. ते म्हणाले, नरेश अरोरा हे सर्व सांभाळायचे. त्यांनीच गुलाबी जॅकेट दादांना दिले. त्यांनी दादांना पुष्पगुछ देऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकला होता. सगळ्या पक्षाची स्ट्रेटजी ते ठरवत होते. आता अजित दादांच्या निधनानंतर हे फक्त एक दोन दिवस दिसले आत्ता ते कुठे आहेत? असा प्रश्न मला पडला म्हणून मी ट्वीट केलं. दादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठ आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होतय का? कारण त्यांचे विचार ऐकुन आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे..#शोधमोहिम pic.twitter.com/LwuhXvAE6w — आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 11, 2026 पुढे बोलताना मिटकरी म्हणाले, कारण ते महाराष्ट्रामध्ये आहेत की देशाबाहेर आहेत ते माहित नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर ते कुठे दिसले नाही. खरंतर ह्या आमच्या दु:खात त्यांनी सोबत राहायला हवं होतं, त्यांनी काही पोस्ट किंवा त्याबद्दल काही बोलायला हवं होतं, पण ते कुठे आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे, आता त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना? आत्ता मला माहित नाही, ते मी असं बोलल्यावर आमच्या नेत्यांना विचारतील की आपल्या पक्षाचा आमदार असा कसा बोलतोय? थोडे ते नाराज होतील. पण मला त्यांचा काही फोन येत नाही, मी ही कधी करत नाही. ट्वीटमध्ये अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले आहेत? “दादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठ आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होतय का? कारण त्यांचे विचार ऐकुन आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे..” सध्या राज्याचे अधिवेशन सुरु असून, सभागृहात अजित पवारांच्या विमान अपघातावर चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. अमोल मिटकरी सातत्याने अपघातावर शंका उपस्थित करत आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, सभागृहात अजून देखील अजित पवारांच्या अपघातावर चर्चा नाही. आत्ता दोन दिवस या आठवड्याचे आहे, पुढच्या आठवड्यात सुद्धा सुट्या आहेत, मग अधिवेशन पूर्ण होईल. म्हणजे यांना चर्चा घडवून आणायची नाही. हेही वाचा : Dhurandhar 2 : धुरंधर 2 ची हवा…! तिकीटाचे दर वाचून बसेल धक्का; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच ‘इतक्या’ कोटींची कमाई