“जेव्हा जेव्हा संसदेत बोलते, तेव्हा पतीला…”; सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर आरोप

Supriya Sule| राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सोलापुरात दाखल झाली आहे. यानिमित्त सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे व खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी “मी जेव्हा जेव्हा संसदेत प्रश्न मांडते, तेव्हा तेव्हा माझ्या नवऱ्याला आयकर विभागाची नोटीस येते,” असे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? Supriya Sule|
“आम्ही पारदर्शकपणे काम केले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारसमोर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हा कळीचा मुद्दा आहे, जो केंद्र सरकार व संसदेच्या अखत्यारित आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सर्वांनी संसदेत बोलले पाहिजे. मी प्रत्येक अधिवेशनावेळी हा मुद्दा आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे प्रश्न संसदेत मांडत असते.
संसद हे असे प्रश्न मांडण्यासाठीचं महत्त्वाचं व योग्य व्यासपीठ आहे आणि मी त्या व्यासपीठाचा पुरेपूर वापर करते. महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे. आम्ही या बाबतीत चर्चा करायला तयार आहोत. प्रस्ताव ताकदीने सरकारने मांडावा. आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. Supriya Sule|
‘आम्ही दडपशाही केलेली नाही’ Supriya Sule|
“सर्वात जास्त संसदेत मी बोलले. आम्ही दडपशाही केलेली नाही. विरोधात बोललो म्हणून इन्कम टॅक्स नोटीस काढलेली नाही. आमच्या 70 वर्षांचा हिशोब काढता, आम्ही कधी असं गलिच्छ राजकारण केलेलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारही नाही. मी जेव्हा जेव्हा संसदेत सरकारविरोधात बोलते, प्रश्न मांडते तेव्हा तेव्हा माझ्या पतीच्या विरोधात नोटीस निघते.
कालच एक नोटीस माझ्या कुटुंबाला मिळाली आहे. त्यानंतर मी परत काही प्रश्न मांडले, मी सरकार विरोधात बोलले. आता अजून एक नोटिस येईल. आम्ही त्याला नोटीस म्हणत नाही, आम्ही त्या नोटिशींना लव्ह लेटर म्हणतो. सरकारला प्रश्न विचारला की अशी लव्ह लेटर येत असतात,” असेही गमतीशीरित्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा:
‘काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठी वेगळा चेहरा असेल तर…’ संजय राऊत स्पष्टच बोलले





