‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील ?’ सचिनच्या घरासमोर युवकाचा ठिय्या

Updated On:
‘आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील ?’ सचिनच्या घरासमोर युवकाचा ठिय्या

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने ट्विट केले आणि त्यानंतर देशभराचत ट्विटर युद्ध पाहायला मिळालं.

रेहानाच्या ट्विटनंतर खेळाडू, बॉलिवूड कलाकारांनी ट्विट करत, भारताला विभागण्याचा प्रयत्न होत असून, तसे होऊ देऊ नका असं आवाहन सेलिब्रेटींनी केले होते. यामध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा समावेस होता. मात्र या ट्विटमुळे सचिनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विविध संघटनांकडून सचिनला धारेवर धरण्यास सुरू केले आहे.

आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील? असं म्हणत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर ठिय्या दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रदेश प्रवक्ता रणजीत बागल याने सचिनच्या घराबाहेर एक पोस्टर घेऊन थेट जाब विचारला आहे. यावेळी रणजीत बागल याला सचिनच्या बंगल्यातील सुरक्षारक्षकाने हटकले. तसेच येथून जाण्याच्या सूचना केल्या.

आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्यानंतर भारताच्या अंतर्गत बाबींवर लक्ष न देण्याचा सल्ला भारतीय सेलिब्रेटींनी दिला होता. यामध्ये सचिन तेंडुलकर याचाही समावेश होता. ‘देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या’, असं ट्विट सचिननं केलं होतं.

आणखी संबंधित बातम्या

Sachin WC Squad : सचिनच्या संघातून बुमराह-श्रेयस बाहेर? व्हायरल टीममागील धक्कादायक सत्य आकाश चोप्राने आणलं समोर

2026-08-24 22:17:04

Sachin WC Squad : सचिनच्या संघातून बुमराह-श्रेयस बाहेर? व्हायरल टीममागील धक्कादायक सत्य आकाश चोप्राने आणलं समोर

Devdutt Padikkal : सचिन-धवनला मागे टाकत देवदत्त पडिक्कलचा नवा विक्रम; गॉल कसोटीत ऐतिहासिक खेळी!

2026-08-18 16:19:40

Devdutt Padikkal : सचिन-धवनला मागे टाकत देवदत्त पडिक्कलचा नवा विक्रम; गॉल कसोटीत ऐतिहासिक खेळी!

Vinod Kambli Biopic : विनोद कांबळीच्या आयुष्यावर येणार बायोपिक; वैयक्तिक आयुष्य आणि संघर्षचा होणार उलघडा

2026-08-16 16:22:30

Vinod Kambli Biopic : विनोद कांबळीच्या आयुष्यावर येणार बायोपिक; वैयक्तिक आयुष्य आणि संघर्षचा होणार उलघडा

Gill Tendulkar Wimbledon : "आता तर नातं पक्कं समजायचं...?" विम्बल्डन सामन्यातील सचिन-गिलचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच चर्चा

2026-07-11 16:33:53

Gill Tendulkar Wimbledon : "आता तर नातं पक्कं समजायचं...?" विम्बल्डन सामन्यातील सचिन-गिलचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वत्र एकच चर्चा

Sourav Ganguly Hall Fame : '१४ वर्षांचे असतानापासून...', गांगुलीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्यानंतर सचिनच्या पोस्टने वेधलं लक्ष

2026-07-09 21:48:00

Sourav Ganguly Hall Fame : '१४ वर्षांचे असतानापासून...', गांगुलीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्यानंतर सचिनच्या पोस्टने वेधलं लक्ष