Kajol and Nysa Devgn : आज अजय देवगण आणि काजोल (Kajol Devgn ) देवगण यांची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgn) आपला वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने काजोलने लेकीसाठी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काजोलने न्यासासोबतचा एक फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. Kajol and Nysa Devgn काजोल अनेकदा तिच्या पोस्ट्समधून मुलगी न्यासा देवगणवरचे प्रेम व्यक्त करत असते. आज न्यासाच्या वाढदिवसानिमित्त काजोलने आपल्या मुलीवरचे प्रेम व्यक्त केले आहे. Kajol and Nysa Devgn काजोलने इंस्टाग्रामवर नॉर्थ बॉम्बे सर्वजनिन दुर्गा पूजा कमिटीमधील स्वतःचे आणि न्यासाचे दोन सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये आई आणि मुलगी दोघीही खूप सुंदर दिसत आहेत. Nysa Devgn या फोटोंमध्ये काजोलने पांढऱ्या रंगाच्या साडीवर लाल रंगाची डिझाईन असलेली साडी नेसली आहे, तर न्यासाने पिवळा रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. मोकळे केस आणि स्टायलिश कानातले घालून तिने आपला या ड्रेसला साजेसा असा लूक पूर्ण केला आहे. View this post on Instagram A post shared by Kajol Devgan (@kajol) जेव्हा न्यासाचा जन्म झाला, तेव्हा माझे जगच बदलून गेले, असे पोस्टमध्ये काजोलने म्हटले आहे. हे फोटो शेअर करताना काजोलने पोस्टमध्ये लिहिले, “मी खूप कृतज्ञ आहे… जेव्हा न्यासाचा जन्म झाला, तेव्हा माझे जगच बदलून गेले… मी माझ्या मुलीसाठी दररोज देवाचे आभार मानते… तू परिपूर्ण आहेस आणि नेहमीच माझी राहशील. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” काजोलच्या या पोस्टनंतर चाहते कमेंट्स सेक्शनमध्ये न्यासाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. Kajol and Nysa Devgn काजोलच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काजोल शेवटची सरजमीन चित्रपटात दिसली होती. अलीकडेच तिने खुलासा केला आहे की न्यासाचा चित्रपटसृष्टीत येण्याचा कोणताही विचार नाही. Nysa Devgn हेही वाचा : Iran US War : अमेरिकेची मोठी कारवाई; इराणचे ‘तुस्का’ मालवाहू जहाज ताब्यात; चर्चेपूर्वी वाढला तणाव