Eknath Shinde : ‘मी शेतात गेलो की, काहीजण म्हणतात नाराज झाला; एकनाथ शिंदेची तुफान फटकेबाजी

Eknath Shinde : अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या माजी नेत्या प्रीती बंड यांनी शिंदेंच्या शिवसेनात पक्षप्रवेश केला आहे. आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राज्याचे उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली, या योजनेच्या विरोधात अनेकजण न्यायालयात गेले होते. पण आज मी सांगतो की लाडकी बहिण योजना कधीही बंद होणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.
तसेच पुढे म्हणाले, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे. फिल्मी डायलॉग आहे न ‘एक बार मैने कमेटमेंट कर दी, तो मै किसीकी भी नही सूनता’ असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी लगावली.
एकनाथ शिंदे म्हणाले कि, यावेळी प्रथमच इतके मंत्री अमरावतीत आले आहेत. या महाराष्ट्रात 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं. जर आले नाही, तर गावात जाऊन शेती करणार असल्याचे म्हणालो होतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला.
प्रिती ताई आपण स्वगृही आलात, तुमच्या पाठीशी हा तुमचा भाऊ उभा आहे. संजय बंड यांनी रक्ताचं पाणी करुन शिवसेना वाढवली पण आता ते बघा काय समजतात. या आमच्या शिवसेनेत कोणीच नेता नाही. शिवसेना अजून आपल्याला वाढवायची आहे, असंही शिंदे म्हणाले.
मेहनत केल्यानंतर काय होते ते बघा. मी शेतात गेलो की, काहीजण म्हणतात बघा गेला, नाराज झाला, मी मजा घेत असतो. पण काहीजण तर विदेशात जातात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी लगावला. मी विचाराशी कधीही तडजोड केली नाही. म्हणून जी पद आहे ती लोकांच्या सेवेत देतो असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.





