मला कॅन्सर झाला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी विचारपूसही केली नाही : यामिनी जाधव

Updated On:

गुवाहाटी – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद प्रतिवाद सुरू झाले असून आता शिंदेंसोबत असलेले आमदारही आपली बाजू आणि खंत बोलून दाखविण्यासाठी समोर आले आहेत.

संजय शिरसाट, तानाजी सावंत, भरत गोगवले यांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्यानंतर भायखळा येथील आमदार यामिनी जाधव यांनी देखील व्हिडीओ शेअर करून खंत व्यक्त केली.

यामिनी जाधव म्हणाल्या की, सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा उद्रेक होतोय. मी ते समजू शकतो. मात्र मी कायम शिवसैनिकच असेल. अनेक अडचणी आल्या परंतु, आम्ही कधीही शिवसेना सोडली नाही. काही महिन्यांपूर्वी मला कॅन्सरच निदान झालं. आमच्या कुटुंबावर हे मोठं संकट होतं, असही त्या म्हणाल्या.

दरम्यान आपल्याला झालेल्या कॅन्सर आजाराविषयीची माहिती आपण पक्षातील प्रमुख नेत्यांना दिली होती. महिला आमदार म्हणून पक्षाचे प्रमुख नेते आपल्या घरी येतील अशी अपेक्षा होती. सर्व शिवसैनिकांनी मला धीर दिला. मात्र प्रमुख नेत्यांनी अर्थात ज्यांकडून अपेक्षा होती, त्यांनी साधी विचारपूसही केली नाही. वास्तविक पाहता, अनेक आमदारांच्या पत्नींना आजारपणात पक्षाचे नेते रुग्णलयात भेटायला गेले होते. मात्र मला भेटायला आले नाही. याच्या खूप यातना झाल्या, असं यामिनी जाधव यांनी म्हटलं.

आणखी संबंधित बातम्या

Cancer drugs : कॅन्सरच्या महागड्या औषधांवर मोठा निर्णय; किंमत 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता

2026-10-08 19:41:38

Cancer drugs : कॅन्सरच्या महागड्या औषधांवर मोठा निर्णय; किंमत 70 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Adulterated Food: भेसळयुक्त अन्नाचा आरोग्याला धोका? रासायनिक मिश्रणांवर तज्ज्ञांचा इशारा; कडक तपासणीची मागणी

2026-10-07 07:48:00

Adulterated Food: भेसळयुक्त अन्नाचा आरोग्याला धोका? रासायनिक मिश्रणांवर तज्ज्ञांचा इशारा; कडक तपासणीची मागणी

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू

2026-10-06 08:43:04

Buldhana Crime News : बुलढाण्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत नगरसेवकाचा मृत्यू