‘कियाराचा घटस्फोट कधी झाला?’ कार्तिकसोबतचा ‘तो’ फोटो पाहून चाहतेही झाले हैराण

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये विवाह बंधनात अडकले होते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतर कियारा आणि अभिनेता कार्तिक आर्यनचे फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहे. अनेकांना वाटले की कार्तिकचे लग्न झाले आहे. तर काहींनी सिद्धार्थ-कियाराचा घटस्फोट झाल्याचे वाटले. मात्र हे तथ्य नसून कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यातील हा फोटो आहे.
या फोटोमध्ये कियारा आणि कार्तिक वधू आणि वराच्या लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये कियारा आणि कार्तिकच्या गळ्यात फुलांची माळ दिसत आहे. कार्तिकनं कियारासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आमच्या फेवरेटला तुमचे फेवरेट बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.’ यावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सिद्धार्थ आणि कियाराचा घटस्फोट कधी झाला?’, ‘सिद्धार्थ, मी असतो तर हे सहनच केलं नसतं’ अशा कमेंट नेटकरी करत आहे.
Humaare favorite ko apna favorite banane ke liye…Shukriya ✨
Thank you for all the love 🤍 #AajKeBaad #SatyaPremKiKatha #29thJUNE pic.twitter.com/dJEH4LN2sb— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) June 12, 2023
दरम्यान, कार्तिक आणि कियारा भूल भुलैया-2′ या चित्रपटानंतर ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. सत्यप्रेमची कथा समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात सुप्रिया पाठक, राजपाल यादव, गजराज राव आणि अनुराधा पटेल हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट येत्या 29 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा चांगला मिळाला होता.





