व्हाट्सअॅपची मोठी कारवाई; फेब्रुवारीत 97 लाख खाती बंद

मुंबई – व्हाट्सअॅपने जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात 97 लाख खाती बंद करण्यात आली. खात्यासंदर्भात तक्रार येण्याअगोदरच बंद केलेल्या खात्यांची संख्या 14 लाख इतकी आहे.
अयोग्य वापरामुळे बंद करण्यात आलेल्या खात्याची आकडेवारी व्हाट्सअॅप दर महिन्याला जाहीर करत आहे. व्हाट्सअॅप वापरणार्यांनी जबाबदारीने या माध्यमाचा कसा वापर करावा, या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना या कंपनीने जारी केल्या आहेत, विशेषत: ब्रॉडकास्टिंग करताना जास्त जबाबदारीने मेसेज टाकण्याची खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
ग्राहकांना सुरक्षित सेवा मिळावी, त्यांची माहिती सुरक्षित रहावी, तसेच अयोग्य वापर करणार्यांची माहिती काढावी, याकरिताव् हाट्सअॅप मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादी सारख्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे सांगण्यात आले.
व्हाट्सअॅपकडे आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाते आणि योग्य शहानिशा करून योग्य प्रकारची कारवाई केली जाते. त्याचबरोबर व्हाट्सअॅपचे परिस्थितीकडे लक्ष असते. अयोग्य प्रकार करणार्यावर कारवाई केली जाते असे स्पष्ट करण्यात आले.





