मस्तच! WhatsApp मध्ये येणार खूपच मजेशीर फीचर, यूजर्सला तयार करता येईल स्वतःचे AI चॅटबॉट

WhatsApp New Feature | इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपकडून यूजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स आणले जातात. आता कंपनीकडून यूजर्ससाठी खास एआय चॅटबॉट फीचर आणले जाणार आहे. सध्या एआयची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे आता कंपनी यूजर्ससाठी एआय फीचर आणत आहे.
व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरच्या मदतीने आता यूजर्सला पर्सनलाइज्ड एआय चॅटबॉट तयार करता येणार आहे. हे नवीन फीचर अँड्रॉइड 2.25.1.26 व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये पाहायला मिळाले होते. आता कंपनी आयफोन यूजर्ससाठी या फीचरची चाचणी करत आहे
WhatsApp च्या या नवीन फीचरचे स्क्रीनशॉट समोर आले आहेत. iOS बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध असलेल्या या फीचरच्या मदतीने यूजर्स विशिष्ट माहिती देऊन स्वतःचे एआय कॅरेक्टर तयार करू शकतील. म्हणजेच, आता यूजर्सला स्वतःच्या गरजेनुसार एआय कॅरेक्टर नियंत्रण करता येईल. तसेच, एआयसोबतचा संवाद देखील नियंत्रित करू शकतील. एआय कॅरेक्टर तयार करण्यासाठी WhatsApp यूजर्सला काही माहिती देखील विचारली जाईल.
📝 WhatsApp beta for iOS 25.6.10.70: what’s new?
WhatsApp is working on a feature to create personalized AI chatbots, and it will be available in a future update!https://t.co/vSl3IpR8uq pic.twitter.com/ECjxPkwEcz
— WABetaInfo (@WABetaInfo) March 8, 2025
यूजर्सने दिलेल्या माहितीच्या आधारावर एआय प्रोफाइल्सपेक्षा वेगळे चॅटबॉट तयार होईल. एआयने सर्वाधिक लक्ष कोणत्या गोष्टीवर केंद्रित करावे हे देखील ठरवता येईल. यूजर्स काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन एआय कॅरेक्टर तयार करू शकतील. यामध्ये एआय कस्टमाइझ करण्याचा पर्याय देखील मिळेल. हे नवीन फीचर एआय टॅबमध्ये उपलब्ध होईल. कंपनीकडून लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.
दरम्यान, WhatsApp गेल्याकाही दिवसात यूजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये रंगीत थीमसह चॅट कस्टमाईज करणे, व्हिडिओ प्लेबॅक स्पीड नियंत्रित करणे, क्लिअर चॅट नोटिफिकेशन्स अशा फीचर्सचा समावेश आहे.





