WhatsAppवर फोटो एडिटिंग, AIचा पर्याय; नवीन येणाऱ्या 5 अप्रतिम फीचर्सबद्दल जाणून घ्या…

WhatsApp New Upcoming Features: व्हॉट्सॲप आज केवळ भारतातच नाही तर जगभरातील करोडो लोक वापरतात. वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी कंपनी सतत नवनवीन फिचर्स आणत आहे. कंपनीने अलीकडेच 5 सर्वात आश्चर्यकारक फिचर्सची चाचणी केली आहे. यामध्ये AI पासून इंटरनॅशनल पेमेंट्स असे अनेक नवीन फिचर्सचा समावेश आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
AI-Powered फीचर्स –
असे म्हटले जात आहे की व्हॉट्सॲपवर एआय चॅटबॉट येत आहे, जे वापरकर्त्यांना ॲपमध्ये अनेक प्रकारची माहिती देईल. मेटा आपले एआय मॉडेल मेटा एआय नावाने व्हॉट्सॲपवर सादर करू शकते. जिथे तुम्हाला कोणताही प्रश्न विचारता येईल. याशिवाय, कंपनी एक नवीन जेनेरिक एआई फोटो एडिटिंग टूल आणत आहे जे काही मिनिटांत ॲपवर फोटो एडिटिंग करेल.
इंटरनॅशनल पेमेंट्स (International Payments) –
लवकरच व्हॉट्सॲपवर इंटरनॅशनल पेमेंट्स पर्यायही येणार आहे. हे फीचर लाँच केल्यानंतर भारतीय यूजर्स ॲपवरून थेट आंतरराष्ट्रीय पेमेंट करू शकतील. वास्तविक कंपनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे ही सुविधा सुरू करणार आहे. तथापि, वापरकर्त्यांना हा आंतरराष्ट्रीय पेमेंट पर्याय मॅन्युअल सुरु करावा लागेल.
Suggested चॅट सेक्शन –
व्हॉट्सॲप लवकरच ॲपमध्ये एक वेगळा “Suggested चॅट सेक्शन” आणत आहे, ज्याचा उद्देश नवीन कनेक्शनसह कनेक्ट होण्याची प्रक्रिया सुलभ करणे आहे. चॅट लिस्टच्या तळाशी असलेला हा नवीन विभाग वापरकर्त्यांचे संपर्क दर्शवेल ज्यांच्याशी त्यांनी यापूर्वी चॅट केलेले नाही.
प्राइवेट मेंशन कॉन्टेक्ट्स (Private Mansion Contacts) –
गोपनीयता आणि सुरक्षितता वाढवण्याबरोबरच, कंपनी WhatsApp वर एक वैशिष्ट्य आणत आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या स्टेटस अपडेटमध्ये संपर्कांना खाजगीरित्या टॅग करता येईल. हे फीचर इन्स्टाग्रामच्या स्टोरी फीचरप्रमाणे काम करेल.
चॅट लॉक फिचर (chat lock feature) –
याशिवाय, कंपनी चॅट लॉक फीचर देखील अपडेट करत आहे, ज्यानंतर यूजर्स केवळ प्राथमिक डिव्हाइसवरच नव्हे तर लिंक केलेल्या डिव्हाइसवर देखील WhatsApp वर चॅट लॉक करू शकतील. लिंक केलेल्या डिव्हाइसवर लॉक केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या प्राथमिक फोनवर एक गुप्त कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुमच्या चॅट्स सर्व लिंक केलेल्या डिव्हाइसवर सुरक्षित होतील.


