नवीन वर्षात ‘या’ स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, हे आहे कारण

WhatsApp Updates: नवीन वर्षामध्ये काही अँड्राइड स्मार्टफोन्समध्ये इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपची सेवा बंद होणार आहे. मेटाने याबाबत माहिती दिली असून, 1 जानेवारी 2025 पासून किटकॅट ओएस आणि त्यापेक्षा जुने व्हर्जन असलेल्या अँड्राइड फोन्समध्ये या अॅपचा वापर करता येणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अँड्राइड किटकॅट व्हर्जनचे अपडेट 2013 मध्ये आले होते. हे व्हर्जन खूपच जुने झाले असून, या ओएसवर चालणाऱ्या फोन्सला सिक्योरिटी अपडेट देखील मिळत नाही. यामुळे अशा फोन्समध्ये व्हॉट्सअॅपचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. कंपनीकडून अशा जुन्या ओएस व्हर्जनवर आधारित फोन्ससाठी कोणतेही अपडेट, बग फिक्स व सिक्योरिटी पॅच जारी केले जाणार नाहीत. त्यामुळे नवीन वर्षात यूजर्सला या मेसेजिंग अॅपचा वापर करता येणार नाही.
1 जानेवारी 2025 पासून या स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही व्हॉट्सअॅप
- Samsung – Samsung Galaxy S4 Mini, Samsung Galaxy S3, Samsung Galaxy Note 2 आणि Samsung Galaxy Ace 3 या फोन्समध्ये आता व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
- Motorola – Moto G, Moto RAZR HD आणि Moto E 2014 चा देखील या लिस्टमध्ये समावेश आहे.
- HTC – या कंपनीच्या One X, HTC One X+, HTC Desire 500 आणि HTC Desire 601 मध्ये व्हॉट्सअॅप बंद होईल.
- LG– एलजी स्मार्टफोन्समध्ये LG Optimus G, LG Nexus 4, LG G2 Mini आणि LG L90 चा समावेश आहे.
- Sony – सोनीच्या Xperia Z, Sony Xperia SP, Sony Xperia T आणि Sony Xperia V फोन्समध्ये व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.
कंपनीनुसार, केवळ अँड्राइड 5.0 आणि आयओएस 12 च्या पुढील व्हर्जनमध्ये व्हॉट्सअॅप वापरता येईल. iPhone 5s, iPhone 6 आणि iPhone 6 Plus यूजर्सला देखील या मेसेजिंग अॅपचा वापर करता येणार नाही.





