हेरा फेरी 3 चं काय होणार? खळखळून हसवणाऱ्या बाबुरावची चित्रपटातून एक्सिट; परेश रावलांनी असा निर्णय का घेतला?

Hera Pheri 3 movie : बॅालीवूडच्या सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ‘हेरा फेरी’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाची अॅानस्क्रीन केमेस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर झाले असतानाच अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी हेरा फेरी ३ ची घोषणा केल्यानंतर चित्रपटावर काम करण्यास सुरूवात करण्यात आली. मात्र, परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून एक्सिट घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याविषयी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी आपले म्हणणं मांडलं आहे.
हेरा फेरी फ्रँचायझीतील परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तीन अभिनेत्यांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यातील एकाही अभिनेत्याने एक्सिट घेतली, तर ती प्रेक्षकांसाठी निराशाजनक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे परेश रावल यांनी घेतलेला निर्णय या चित्रपटासाठी मोठा आर्थिक फटका देणारा ठरू शकतो.
काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, अक्षय कुमारच्या प्रोडक्शन हाऊस ‘केप ऑफ गुड फिल्म्स’ने परेश रावल यांना 25 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस देखील पाठवली आहे. या नोटीसमधून परेश रावल यांनी चित्रपटातून अचानक एक्सिट घेतल्याे त्यांना नुकसान भरपाई मागण्यात आली आहे.
हेरा फेरी चित्रपटातील बाबुराव, राजू आणि श्याम या पात्रांना प्रेक्षकांच्या मनात ठासवण्याचं काम अनुक्रमे अभिनेते परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांनी केलं. ही तिन्ही पात्र अजरामर झाली. या पात्रांच्या अनेक मीन्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विशेष करून बाबुराव गणपतराव आपटे हे पात्र सर्वांच्या लक्षात राहिलं. आता हेच पात्र हेरा फेरीच्या तिसऱ्या भागाचा हिस्सा नसल्याने फॅन्सचा हिरोमोड झाला आहे.




