Rakesh Gidde : क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू
Rakesh Gidde : बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने केजमध्ये शोककळा पसरली आहे.

Rakesh Gidde : बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रेणापूर फाटा येथे लातूर-अंबाजोगाई महामार्गावर घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गिड्डे हे स्वतःच्या खासगी कारने प्रवास करत होते आणि कारमध्ये ते एकटेच होते. रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारचा वेग जास्त असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये गिड्डे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. Rakesh Gidde
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य करत गिड्डे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात हलवला. Rakesh Gidde

Rakesh Gidde : क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; भीषण अपघातात केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू
राकेश गिड्डे हे एक कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम महसूल अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली अपघाती निधनामुळे महसूल प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली असून केज तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा शोध घेतला जात आहे.





