याला काय म्हणावं..! तरुणानं थेट साईनबोर्डवर लटकून केला ‘योगा’ ; पहा व्हिडिओ

२१ जूनला म्हणजे काल जग भरात लोकांनी योग डे साजरा केला. भारतातील लोकांनी आपल्या अनोख्या शैलीत योगा करत काल योगा डे साजरा केला कोणी १०८ सूर्यनमस्कार घालून तर कोणी पाण्यात योग करत , तर काही महिलांनी साडी घालून योगा केला. काल योगा डेचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशात एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये दारूच्या नशेत एका माणसाने खूप उंचीवर लावलेल्या साईनबोर्डवर चढून पुशअप्स आणि योग करतोय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये खूप उंचीवर लावलेल्या साईनबोर्डवर एक मद्यधुंद व्यक्ती दिसत आहे. तो साइनबोर्डवर चढून पुशअप्स करताना दिसतोय.
व्हायरल होणार व्हिडिओ ओडिशातील आहे, यामध्ये दिसणारी व्यक्ती साइनबोर्डच्या मध्यभागी जाऊन योगासने करते. त्यानंतर तो पुशअप्स करायला लागतो. दरम्यान, खाली उपस्थित असलेले लोक आपली वाहने थांबवून त्याच्याकडे पाहू लागले. तर काही वाहने खालून जात आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून हा व्हिडिओ ओडिशातील संबलपूरमध्ये रेकॉर्ड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लोकांनी शेअर केला आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत. या मद्यधुंद व्यक्तीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे, तर काही लोकांचे म्हणणे आहे की अशा निष्काळजीपणाबद्दल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एका यूजरने लिहिले की, ‘दुसरी जागा मिळाली नाही.’ आणखी एका युजरने कॉमेंट्स केली की, भाऊ, हिरो गिरी दाखवायची असेल तर सिंहासमोर दाखव. रस्त्यावर दाखवू नका. हद्दच केली’ असं म्हणत या व्हिडिओवर टीका केली आहे.





