अण्णा बनसोडेंना ‘विधानसभेचे उपाध्यक्ष’ करुन अजितदादांनी कोणता राजकीय डाव टाकला? समजून घेऊयात 5 मुद्यांवरुन

Ajit Pawar | ३ मार्च रोजी सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ मार्च रोजी संपले. या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी चालू आर्थिक वर्षातील राज्याचे बजेट सादर केले. बजेटवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आल्या. विधीमंडळातील दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले. राज्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाऐवजी वेगळ्याच मुद्यांवरुन सभागृहात खडाजंगी झाली. यानंतर शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची निवड करण्यात आली. यानंतर बनसोडे यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद देऊन अजित दादांनी काय साध्य केले याची चर्चा केली जात आहे. याविषयी जाणून घेऊयात…
१. दादांची राजकीय खेळी?
महायुतीची राज्यात सत्ता आल्यानंतर अनेक मंंत्रीपदावरुन तिन्ही पक्षात मोठी रस्सीखेच झाली. तिन्ही पक्षांकडून मोठ्या खात्यांवर दावा सांगण्यात आला होता. महायुतीमध्ये भाजपच सर्वात मोठा भाऊ असल्याने भाजपला सर्वात जास्त आणि महत्वाची खाती मिळाली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवले. अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थ व नियोजन, महिला व बालकल्याण, वैद्यकीय, मदत व पुर्नवसन खाती मिळली.
पक्षातील अनेक नेते मंत्री पद मिळणार या आशेवर होते. मात्र, अनेकांची मंत्री पदी वर्णी लागली नाही. पक्षातील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीररित्या बोलूनही दाखवली. पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही विभाग पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचे मानले जातात. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना देखील आपल्याला मंत्री पद मिळणार अशी आशा होती. मात्र, त्यांची वर्णी मंत्रीपदावर नसली लागली तरी विधानसभेच्या अत्यंत महत्वाच्या अशा उपाध्यक्ष पदावर लागली आहे. दादांनी पिंपरीला उपाध्यक्ष पद देऊन मोठी राजकीय खेळी खेळली आहे. याची प्रचिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
२. विधानसभेतील दादांचे भाषण बरचं काही सांगून गेले
अजितदादांनी अण्णा बनसोडे यांची विधासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभिनंदानापर भाषणात अनेक सूचक विधाने केली. दादांनी बनसोडे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. बनसोडे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी आमदार ते थेट आता विधानसभा उपाध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला सर्वांना राजकीय पार्श्वभूमी लाभलेले आहे परंतु अण्णाचे तसे नाही त्यांनी स्वत:च्या मेहनतीवर इथपर्यंत पोहचले आहेत. अण्णा यांची मतदार संघात कामाचा माणूस म्हणून ओळख आहे. असे म्हणत दादांनी अनेक गोष्टींचा संदर्भ दिला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी भविष्यात पिंपरीला मंत्रीपद मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
३. दादांचा गड
अनेक वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. या काळात अजित पवार यांनी स्वत: येथे लक्ष घालून विविध विकास कामे राबविली. याचा उत्लेख दादा त्यांच्या भाषणात करत असतात. महापालिकेवर सत्ता असताना पिंपरी चिंचवडचा कायापालट केला असल्याचे विधान दादांनी अनेकदा केला आहे. नंतरच्या काळात राज्यात बदलाचे वारे वाहू लागले. या काळात पिंपरी चिंचवड महापालिका राष्ट्रवादीला गमवावी लागली आणि त्यानंतर भाजपची सत्ता महापालिकेवर आली. यामुळे दादांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर बनसोडे यांना उपाध्यक्ष पद दिले आहे. त्यामुळे काही महिन्यांवर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार कोणती रणनीती आखणार हे पाहणे महत्वाचे असणार आहेत.
४. सुनेत्रा पवारांची सरप्राईज व्हिजिट
पिंपरी चिंचवडवर (भाजप येण्याअगोदर) आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित दादांनी त्यांच्या मुलाला मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. मात्र, पार्थ पवार यांचा पराजय निवडणुकीत झाला. त्यानंतर हळूहळू पक्षाचा होल्ड कमी होत गेला. आता काही महिन्यांपूर्वीची गोष्ट अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी महापालिकेला सरप्राईज व्डिजिट देत महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला. निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा दावा पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केला होता. सुनेत्रा पवार यांनी दिलेले ही भेट याची बरीच चर्चा झाली होती.
५. नेते स्वगृही येण्याची शक्यता
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी महायुतीमधील घटक पक्षात प्रवेश केले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर लोकसभेची निवडणूक देखील लढवली. मावळ मतदार संघातून वाघेरे हे ठाकरे गटाकडून उभे राहिले होते. मात्र, या मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे पुन्हा विजयी झाले. यामुळे वाघेरे यांच्या वाटेला पराभव आला. आता नुकतीच अण्णा बनसोडे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला संजोग वाघेरे यांनी हजेरी लावल्याने ते स्वगृही येणार असल्याची चर्चा केली जात आहे.





