‘ही कसली फॅशन?’ गायिका नेहा कक्कर अनोख्या एअरपोर्ट लुकमुळे ट्रोल

Neha Kakkar| बॉलीवूड गायिका नेहा कक्करने अनेक सुपरहिट गाणी केली आहेत. तिच्या गाण्यांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळत आहे. गाण्यासोबतच तिच्या अनोख्या लुकची अनेकदा चर्चा होत असते. नुकताच नेहाचा एअरपोर्ट लुक समोर आला आहे. ज्यात तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.
नेहा कक्कर अलीकडेच विमानतळावर दिसली. नेहाला पाहून पापाराझींनी तिचे फोटो कढले. यावेळी नेहाने राखाडी रंगाची सैल पँट आणि मॅचिंग टॉप घातला होता. तिने वर काळ्या रंगाची ब्रा घातली होती. तिच्या लूकने सर्वांनाच थक्क केले. सध्या तिचा हा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल असून ती विचित्र लूकमुळे ट्रोल होत आहे.
View this post on Instagram
नेहा कक्करचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स त्यावर कमेंट करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ‘नेहा दिवसेंदिवस वेडी होत चालली आहे,’ ‘ही कोणती नवीन फॅशन आहे की वर ब्रा घातली जाते?’, ‘ही कसली फॅशन काहीही घालशील का?’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा:
चंदीगडला कलम २४० अंतर्गत आणण्याची सरकारची तयारी ; पंजाबमध्ये गोंधळ. नेमके हे कलम काय आहे? जाणून घ्या





