सायबर गुन्हेगारांचा नवा खेळ! आता थेट ‘क्यूआर कोड’द्वारे फसवणूक, नुकसान टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

QR Code Scam: तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, तर याच तंत्रज्ञानाचा वापर सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी करत आहे. सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून होणारा फसवणुकीचा असाच एक प्रकार समोर आला आहे. क्यूआर कोड स्कॅम अथवा क्विशिंगच्या (Quishing) माध्यमातून लोकांची खासगी व आर्थिक माहिती चोरी केली जात आहे.
क्विशिंग नक्की काय आहे?
क्विशिंग हा ऑनलाइन फसवणुकीचा एक प्रकार आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार बनावट क्यूआर कोडचा वापर करतात. हे क्यूआर कोड स्कॅन केल्यास यूजर्स इतर वेबसाइट्सवर जातात व या वेबसाइट्सच्या माध्यमातून वैयक्तिक व बँकेशी संबंधित माहिती चोरी केली जाते.
या क्यूआर कोडमध्ये काही सॉफ्टवेअर्स असतात, ज्याच्या मदतीने फोनमधील सर्व माहिती चोरी केली जाते. याशिवाय, या वेबसाइट्सवर गेल्यावर खासगी माहिती व यूपीआय पिन मागितला जातो. अनेकदा यूजर्सला यूपीआय अॅपच असल्याचे वाटते, त्यामुळे ते यूपीआय पिन देतात. मात्र, यामुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
Have You Heard About QR Code Scams? Stay safe! Avoid scanning suspicious QR codes.
To report any cyber crime call at 📞1930 or go to https://t.co/pVyjABtwyF !
For more cyber safety tips, follow @Cyberdost !#I4C #AapkaCyberDost #Quishing #FakeQRCode #QRCodeScam #Malware pic.twitter.com/qUSF7AAxDg— CyberDost I4C (@Cyberdost) January 12, 2025
अशा फसवणुकीपासून कसे सुरक्षित राहाल?
- केवळ विश्वासार्ह्य क्यूआर कोडच स्कॅन करा. अनोळखी व्यक्तीने पाठवलेले क्यूआर कोड स्कॅन करणे टाळा.
- क्यूआर कोड स्कॅन केल्याने वेबसाइट अथवा यूआरएल बनावट तर नाही ना, हे तपासा.
- बँक अथवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी संबंधित क्यूआर कोड स्कॅन करण्यापूर्वी खात्री करून घ्या.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक खात्याशी संबंधित व यूपीआय पिनची माहिती कोणत्याही बनावट वेबसाइटवर शेअर करू नये. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

