Jay Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते. मात्र अजित पवार गटाकडून याबाबत कोणतीही ठाम भूमिका पुढे येत नाही. यातच आता अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. “विलिनीकरणासंदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही. मी छोटा आहे, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ दादा असतील बाकीचे ज्येष्ठ नेते असतील ते ठरवतील. विलिनीकरण हा राजकारणातील भाग आहे, त्यावर मी जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. मला वाटतंय की आम्ही कुटुंब म्हणून सर्व एकत्र राहावं. जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा पवार कुटुंब एकत्र होते, आजही आम्ही एकमेकांशी बोलतो, “असे म्हणत जय पवार यांनी विलिनीकरणाच्या चर्चेवर अधिक बोलणे टाळले. Jay Pawar शरद पवार – सुनेत्रा पवार बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी “बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, शरद पवार साहेब सुद्धा आग्रह करत आहेत की, निवडणूक बिनविरोध व्हावी. दादांचं काम अनेक वर्ष सर्वांनी पाहिलं आहे, बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्याही मनात निवडणूक बिनविरोध व्हावी हीच भावना आहे. जर विरोधकांना लढायचं असेल तर त्यांनी लढावं,” असेही जय पवार म्हणालेत. तसेच आयुष्यात कधी अजित पवारांशिवाय लढावं लागेल असा विचारही केला नव्हता, अशी भावनाही जय पवारांनी व्यक्त केली. ‘फायनल अहवाल सर्वांसमोर आल्यानंतर स्पष्टता देईल’ जय पवार यांनी पत्रकार परिषद लांबणीवर पडण्याचं कारणही सांगितलं. “पत्रकार परिषद न घेण्याचं काहीही कारण नाही, जे मुद्दे मला बोलायचे होते त्या मुद्द्यांमध्ये काही मुद्दे रोहित दादांनी सर्वांना सांगितले आहेत. मला जे मुद्दे बोलायचे होते ते रोहित दादांनी कव्हर केले आहेत. मला वाटतंय आता जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही, तोपर्यंत मी उगीचच लोकांच्या मनात मतभेद करायला नको. जे आम्हाला वैयक्तिक वाटतं ते वाटतं, पण जेव्हा फायनल अहवाल येईल तेव्हा मी सर्वांसमोर स्पष्टता देईल. मी त्या रोहित सिंहचे व्हिडिओ टाकले. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बिल्डिंग पडली की मालकाला अटक होते. इंजिनिअरला होत नाही. हॉटेलला आग लागली की हॉटेल मालकाला अटक होते. मग इथे असं का होत नाही?”, असा सवाल देखील जय पवार यांनी उपस्थित केला. हेही वाचा: Pune Railway : पुणे रेल्वेची मोठी कामगिरी! १२५ गुन्हेगार जेरबंद, पण ४१२ मुलांच्या सुटकेने वेधलं सर्वांचं लक्ष