‘जे सुरू आहे ते बेकायदेशीर, दुपारी ३ पर्यंत जागा रिकामी करा’; मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश

Maratha Reservation In Mumbai | मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनसाठी हजारो आंदोलक मुंबई दाखल झाले आहेत. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्याने मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर हायकोर्टाने या आंदोलनाची दखल घेत मनोज जरांगेंसह आंदोलनकर्त्यांना खडसावले होते.
यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयात सलग दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातील याचिकांवरील सुनावणीला सुरुवात झाली आहे. मराठा आंदोलकांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मानेशिंदे युक्तिवाद करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पुढील सुनावणी 3 वाजता
मराठा आंदोलकांकडे कोणतीही परवानगी नसल्याने तत्काळ जागा रिकामी करावी, यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली. अन्यथा कोर्टाचा अवमान समजून कायदेशीर कारवाई करू, असे स्पष्ट निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले. जे सुरू आहे ते बेकायदेशीर.. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व सुरळीत हवे, अन्यथा आम्ही स्वत: जाऊनआढावा घेऊ, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने देण्यात आल आहे. दरम्यान, पुढील सुनावणी 3 वाजता होणार आहे.
मुंबई पोलिसांनीही मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामं करण्यास सांगितले आहे. मात्र मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:
“आता वेळ आहे थांबण्याची…, मविआतील तीन पक्षांना राजकारण करायचे”; भाजप नेत्याचे जरांगेंना आवाहन





