मॉक ड्रील म्हणजे काय ? ; आपत्कालीन परिस्थितीत नेमकं काय करावं आणि काय नाही ? वाचा

What is a mock drill? । भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सुरक्षा तयारी आणखी तीव्र केली आहे. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना नागरी संरक्षणासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. ७ मे रोजी एक मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवला जाणार आहे.
विमानतून हल्ला झाल्यावर नागरिकांनी स्व संरक्षणासाठी करायच्या उपाय योजनांसाठी मॅाक ड्रिल करण्यात येते. सर्व नागरिकांनी मॅाक ड्रिलमध्ये सहभागी होणं बंधनकारक असतं. यावेळी सायरन वाजवला जातो. सायरन वाजला की नागरिकांनी मोकळ्या जागेत धाव घ्यायची. घरात तळमजला, तळघर असेल तर तिथे थांबायचे. यासह संरक्षण भिंत असेल, आडोश्याची जागा असेल पण मोठी इमारत नसेल अशा ठिकाणी लपायचे आणि आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करायचाय.
मॉक ड्रिल हा केवळ एक अभ्यास नव्हे तर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मॉक ड्रिल ही युद्ध किंवा आपत्तीसारख्या कोणत्याही मोठ्या आपत्कालीन परिस्थितीपूर्वी केलेली तयारी असते.
गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना नागरी संरक्षणासाठी तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. ७ मे रोजी एक मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहे. ज्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवला जाणार आहे. युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्यास किंवा हवाई हल्ला झाल्यास सामान्य नागरिकांना त्यांचे प्राण कसे वाचवायचे हे शिकवणे हा या सरावाचा उद्देश आहे.
मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितल्या What is a mock drill? ।
* हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट करणे
* रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे?
* हल्ला झाल्यास पडझड झाली आणि काही दुखापती झाल्या तर त्यांना उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची?
* विद्यार्थी नगरसेवक आणि एनसीसीचे छात्र यांचा सहभाग कसा असला पाहिजे?
* महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया आणि हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव, याप्रमाणे काही निर्देश देण्यात आले असून त्याची मॉक ड्रील करण्यात येणार आहे.
मॉक ड्रिल आणि ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे काय?
मॉक ड्रिल ही एक प्रकारची “प्रॅक्टिस” आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की जर एखादी आपत्कालीन परिस्थिती (जसे की हवाई हल्ला किंवा बॉम्ब हल्ला) आली. तर सामान्य लोक आणि प्रशासन किती आणि कसे प्रतिक्रिया देतील.
ब्लॅकआउट रिहर्सल म्हणजे संपूर्ण परिसरातील दिवे ठराविक काळासाठी बंद करणे. जर शत्रू देशाने हल्ला केला तर अंधारात परिसर कसा सुरक्षित ठेवता येईल हे दाखवणे हा त्याचा उद्देश आहे. यामुळे शत्रूला लक्ष्य करणे अवघड होऊन जाते.





