“छत्रपती संभाजी महाराज यांनी १६ भाषा शिकल्या ते काय…”; संजय गायकवाड यांच्या विधानामुळे नवा वाद

Sanjay Gaikwad | पहिलीपासून शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे राज्यात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली होती. अखेर राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र आले. या मेळाव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. ज्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
संजय गायकवाड काय म्हणाले?
“फक्त हिंदीचा विषय नाही आहे. परराज्यात गेल्यास हिंदी भाषा तुम्ही बोलणार नाहीत का? तुम्हाला जगात टिकायचं असेल तर, सगळ्याच भाषा अवगत असल्या पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज यांनी १६ भाषा शिकल्या ते मुर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसूबाई, जिजाऊ, यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काय मुर्ख होते का?’, असे अपशब्द यावेळी संजय गायकवाड यांनी वापरले.
“भाषेवरून राजकारण करणं चुकीचं आहे. जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल, तर उर्दू भाषा देखील आपल्याला अवगत असायला पाहिजे,” असंही संजय गायकवाड यावेळी म्हणाले.
यावेळी संजय गायकवाड यांनी ठाकरे ब्रँडवरही टीका केली. “ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिलेला नाही, लोकांची किती काम करतात हे महत्त्वाचं आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच २८८ आमदार निवडून आले असते, त्यावेळी देखील ७० ते ७४ जागा निवडून आणता आल्या नाहीत”, अशी टीका संजय गायकवाड यांनी केली.
“१५ वर्षांपूर्वी जर एकत्र आले असते तर काही तरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचं विचार सोडून उद्धव ठाकरे गेले, त्यामुळे हिंदुत्व शिल्लक राहिलं नाही. मुळात राज ठाकरेंनी टाळी देण्यासाठी फार उशीर केला त्यामुळे फार फार तर केसाचा फरक जाणवेल. आता तुम्ही किती लोकांची काम करतात यावर सगळं ठरतंय,” असेही ठाकरे बंधुंच्या एकत्रित येण्यावर गायकवाड म्हणाले.
हेही वाचा :
आता कॅामेडीचा डोस डबल होणार! ‘चला हवा येऊ द्या 2’ मध्ये या अभिनेत्याचे धमाकेदार एन्ट्री, VIDEO पाहा…





