Shehnaaz Gill | अभिनेत्री शहनाज गिलला ‘बिग बॉस १३’मुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात सिद्धार्थ शुक्ला आणि तिच्या जोडीला प्रेक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली. ‘बिग बॉस’ नंतरही त्याचे एकमेकांवरील प्रेम कायम होते. मात्र २०२१ साली सिद्धार्थचं अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. मात्र या दु:खातून सावरत तिने मेहनतीने मोठे यश मिळवले आहे. नुकतेच तिने एका मुलाखतीत सिद्धार्थच्या आठवणींना उजाळा दिला. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर स्वतःमध्ये झालेले बदल आणि आपल्या प्रवासाबद्दल शहनाजने सांगितलं. “सिद्धार्थच्या निधनानंतर मी आणखी समजूतदार झाले. तो मला समजूतदारपणा देऊन गेला. जेव्हा ती घटना घडली त्यानंतर मी जास्त समजूतदार झाले आहे. नाहीतर, मी आता सुद्धा बिग बॉसमध्ये होते तशीच जगाची किंवा कोणाचीच पर्वा न करणारी असते. तुम्ही बिग बॉसमध्ये जी शहनाज पाहिली तिने आयुष्यात खूप संघर्ष केला. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर मी जे गमावलं त्याची तुलना कशासोबतच होऊ शकत नाही.” करिअरची शून्यापासून सुरुवात केली पुढे शहनाज म्हणाली, “मी चंदीगढला परत जाणार होते. पण सिद्धार्थने मला थांबवलं होतं. सिद्धार्थने माझ्यासाठी इथे सगळी व्यवस्था केली. मला त्यावेळी मुंबई बद्दल काहीही माहित नव्हतं. मी स्वत:वर काम केलं, स्वत:कडे लक्ष दिलं आणि करिअरची शून्यापासून सुरुवात केली.” Shehnaaz Gill | बिग बॉसचे जुने रील्स इन्स्टाग्रामवर पाहून काय वाटतं? यावर शहनाज म्हणाली, ‘कधी कधी मी ते रील्स बघते आणि विचार करते की कशी होते मी? आयुष्याने मला पूर्णपणे बदलून टाकलं आहे. ती मुलगी वेगळीच होती. सहज आणि हसमुख होती. पण आयुष्य आपोआप बदलं. माझ्या भावानेही माझ्यात बरेच बदल केले.” Shehnaaz Gill | दरम्यान, शहनाजचा ‘इक कुडी’ सिनेमा नुकताच रिलीज झाला. यातील शहनाजच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. याआधी ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातही दिसली होती. Shehnaaz Gill | हेही वाचा: नोरा फतेहीची बॅालिवूडमधील आवडती गायिका श्रेया घोषाल; कौतुक करत म्हणाली “ती ज्या पद्धतीने गाते….”