Shweta Tiwari : श्वेता तिवारीला काय झालं? अचानक रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट
Shweta Tiwari : आगामी 'द ट्रेटर्स 2'च्या प्रोमोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा करताना माजी पतीकडून झालेल्या कथित फसवणुकीवर भाष्य केले होते. त्यामुळे शो सुरू होण्यापूर्वीच ती चर्चेचा विषय ठरली होती.

Actress Shweta Tiwari admitted to hospital : अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या करण जोहरच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स 2’ मुळे चर्चेत आहे. या शोचा प्रीमिअर १३ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, त्यामध्ये श्वेता स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. मात्र, शोच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच तिच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
‘कसौटी जिंदगी की’, ‘परवरिश’ आणि ‘मेरे डॅड की दुल्हन’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या श्वेताने अनेक रिअॅलिटी शोमध्येही आपली छाप सोडली आहे. आगामी ‘द ट्रेटर्स 2’च्या प्रोमोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा करताना माजी पतीकडून झालेल्या कथित फसवणुकीवर भाष्य केले होते. त्यामुळे शो सुरू होण्यापूर्वीच ती चर्चेचा विषय ठरली होती.
मुनव्वर फारूकी, मल्लिका शेरावत, रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूजा, अभिषेक मल्हान, पारुल गुलाटी, आदित्य कुलश्रेष्ठ, हरमन सिंघा, तान्या पुरी, अंश चोपड़ा, करण सिंह मैजिक, रिदा थरना, रणवीर बरार हेही या शोचा भाग आहेत.
दरम्यान, आता श्वेता तिवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, श्वेताला डेंग्यूची लागण झाली आहे.
सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना व्यक्त केल्या आहेत.






