फोनमध्ये लक्ष देणं पडलं महागात ! अभिनेत्री काजोलसोबत दुर्गापूजेनंतर काय घडलं ? पहा VIDEO

मुंबई – दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Actress Kajol) दुर्गापूजेत दिसली. काजोल दरवर्षी हा सुंदर उत्सव तिच्या मित्रपरिवारासह मोठ्या थाटामाटात साजरा करते. यादरम्यान मोबाईलकडे जास्त लक्ष देताना काजोल अक्षरशः पडता पडता वाचली. यावेळेसचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
सर्वसामान्यांप्रमाणे काजोल देखील कार्यक्रमादरम्यान आपल्या फोनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.यावेळी काजोलचा पारंपारिक लूक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाला, मात्र दुर्गापूजेदरम्यान काजोलसोबत असे काही घडले, ज्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
दुर्गा पूजा (Durgapuja) पंडालमध्ये काजोल स्टेजवर होती आणि तिचे सर्व लक्ष तिच्या फोनवर होते. त्यानंतर स्टेजच्या कडेला पोहोचताच ती अचानक खाली कोसळली.फोनमध्ये लक्ष असल्यामुळे तिच्या हे देखील लक्षात आले नाही की, आपण स्टेजच्या कडेला पोहचलो आहोत. मात्र, काजोल अडखळताच खाली उभ्या असलेल्या लोकांनी तिला पकडले आणि तिला पूर्णपणे पडण्यापासून वाचवले. या घटनेमुळे काजोलच्या पायाला दुखापत झाली आहे. यादरम्यान तिचा फोनही खाली पडला. यानंतर तिचा मुलगा युगही आईची काळजी घेताना दिसत होता.
View this post on Instagram
यावेळी काजोल पारंपरिक वेशात दुर्गापूजेसाठी आल्याने तिचे कौतुकही झाले. मात्र फोनकडे जास्त लक्ष दिल्याने अनेकांनी सोशल मीडियावर तिला खडे बोल सुनावले आहेत.





