“नरक इथे आहे आणि देवीही…”; माँ चित्रपटाचं पहिल पोस्टर समोर; अभिनेत्री काजोलची असणार लक्षवेधक भूमिका
Updated On:

Actress Kajol : अभिनेत्री काजोलचा आगामी चित्रपट ‘माँ’ हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा पौराणिक हॉरर चित्रपट 27 जून 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. विशाल फुरिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे, तर सायविन क्वाड्रास यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. काजोलसोबत रोनित बोस रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि खेरिन शर्मा यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
काजोलने कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात माँ कालीचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. यावेळी ती म्हणाली, “ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात मजबूत आणि आव्हानात्मक भूमिका आहे.” चित्रपटाचा ट्रेलर 29 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, त्याने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढेल. काजोलने सोशल मीडियावर “रक्षक आणि भक्षक” या थीमसह चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरची झलक शेअर केली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये या अनोख्या हॉरर थ्रिलर चित्रपटाबद्दल उत्साह निर्माण झाला आहे.
कोलकाता येथून काजोलने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू केले आहे. माँ या चित्रपटापूर्वी काजोलने अनेक महिलाप्रधान चित्रपटांमध्ये काम केले आहे. हा चित्रपट देखील महिला प्रधान असून काजोलची व्यक्तीरेखा लक्षवेधक असणार आहे. काजोलने ‘दो पत्ती’ आणि ‘दुश्मन’ सारख्या महिलाप्रदान चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तिच्या नव्या माँ चित्रपटातील भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये काजोलने एका मुलीला धरले आहे आणि पोस्टरमध्ये माँ काली आणि डेव्हिल दोघांचेही रूप दाखवले आहे. कॅप्शन आहे: “नरक इथे आहे आणि देवीही आहे.” असे लिहिले आहे.





