वॉशिंग्टन- असे म्हटले जाते की प्रेम आंधळे असते. अमेरिकेत या आंधळ्या प्रेमामुळे पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही गोष्ट आहे अमेरिकेत राहणाऱ्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याची, जी आपल्या आजोबांच्या वयाच्या प्रियकरासोबत त्यीच्या आई -वडिलांना भेटण्यासाठी घरी पोहोचली. मात्र पालकांनी पोलिसांना फोन करून घरी बोलावले.
19 वर्षीय मुलीने ही घटना उघड केली आहे, जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या 61 वर्षांच्या प्रियकरासोबत आई-वडिलांची ओळख करून देण्यासाठी घरी पोहोचली. पालकांशी ओळख करताच तिचे पालक चिडले आणि त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला.
लग्न करण्याचा घेतला निर्णय
मुलीने खुलासा केला आहे की, तिने तिच्या पालकांना कसेतरी लग्नासाठी तयार केले आणि नंतर तिच्या 61 वर्षांच्या प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 61 वर्षांचा प्रियकर आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती. त्याची मुले मुलीच्या वयापेक्षा जास्त वयाची होती. त्यामुळे तिचे पालक खूप चिडले आणि त्यांच्या लग्नासाठी कोणत्याही प्रकारे तयार होत नव्हते.
वयात 42 वर्षांचा फरक
मुलीने सांगितले आहे की, तिच्या पालकांनी पहिल्यांदा पोलिसांना फोन केला, परंतु नंतर त्यांनी त्यांच्या नातेसंबंधास सहमती दर्शविली. आणि नंतर दोन्ही कुटुंबांचे संबंध जुळले. मुलीने म्हटले आहे की, संबंध प्रस्थापित झाल्यानंतर तिच्या 61 वर्षीय प्रियकराचे तिच्या घरात स्वागत करण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघांमध्ये 42 वर्षांचे अंतर आहे, तरीही ती मुलगी त्याच्या प्रेमात पडली.
दोघांची भेट कशी झाली?
मुलगी एक पोलीस अधिकारी आहे आणि तिचे नाव ऑड्रे चेयेने आहे. ती तिच्या प्रियकराला केविनला पहिल्यांदा 2020 मध्ये डेटिंग साइटवर भेटली. केविन त्यावेळी 60 वर्षांचा होता आणि मुलगी 18 वर्षांची होती. दोघांच्या वयातील 42 वर्षांच्या अंतरानंतरही दोघांनीही एकमेकावर प्रेम जडले. मुलगी सांगते की तिच्या प्रियकराचे बायोडेटा पाहून ती आकर्षित झाली. 61 वर्षीय केविनने आपल्या रेझ्युमेमध्ये लिहिले होते की तो एक अनुभवी लष्करी पोलीस अधिकारी आहे.