संदिपसिंह-भाजप मध्ये नेमके काय कनेक्शन?

नवी दिल्ली – मादक द्रव्यांचा पुरवठा करण्याच्या संबंधात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली संदिपसिंह नावाची व्यक्ती ज्येष्ठ भाजप नेत्यांच्या अंत्यत निकटच्या संपर्कात असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. मोदींवर जो चित्रपट काढण्यात आला होता त्या चित्रपटाचेही तेच निर्माते आहेत.
सुशांतसिंह प्रकरण घडल्यानंतर संदिपसिंह यांने महाराष्ट्र भापच्या कार्यालयात गेल्या काहीं महिन्यात 53 फोन कॉल्स केले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर संदिपसिंह आणि भाजपचे नेमके काय कनेक्शन आहे याची चौकशी करण्याची गरज आहे असे प्रतिपादन कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी आज दिल्लीत ऑनलाईन पत्रकार परिषदेत केले.
संदिपसिंह आणि देवेंद्र फडणवीस यांचेही नेमके काय संबंध आहेत हेही स्पष्ट होण्याची गरज सिंघवी यांनी यावेळी व्यक्त केली आहे. संदिपसिंह यांना वाचवण्यासाठी भाजप मधून कोण प्रयत्न करीत आहे हेही लोकांपुढे आले पाहिजे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
संदिपसिंह हे दिवंगत अभिनेते सुशांत रजपुत यांचेही निकटवर्तीय होते. आपल्याला वाचवण्यासाठी ते भाजपच्या कोणत्या नेत्यांच्या संपर्कात होते हेही लोकांपुढे आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात संदिपसिंह यांचाहीं संबंध असल्यानेच त्यांना वाचवण्यासाठी सीबीआयने या केसचा तपास स्वताकडू मागून घेतला काय आणि नेहमी अशा प्रकरणात भाजपशी संबंधीत लोकच कसे असतात असे प्रश्नही कॉंग्रेस प्रवक्ते सिंघवी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजप मध्ये संदिपसिंह चा बॉस कोण आहे, हे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली. या साऱ्या प्रकरणाची सीबीआयने दखल घेतली पाहिजे असेही सिंघवी म्हणाले.
याच संदिपसिंह याने 29 मार्च रोजी केलेल्या मॉरीशस दौऱ्यात एका अल्पवयीन स्वीस मुलीवर हल्ला करून तिचा विनयभंग केला होता. त्याच्या विरोधात तेथे रितसर तक्रार दाखल आहे त्या तक्रारीचे पुढे काय झाले याचाही खुलासा व्हायला हवा असे त्यांनी सांगितले.
संदिपसिंह याची चित्रपट निर्मीती कंपनी तोट्यात असताना त्याच्या कंपनीला व्हायब्रंट गुजरात मध्ये 177 कोटी रूपयांचे कंत्राट कसे काय मिळाले असा प्रश्नहीं त्यांनी उपस्थित केला.





