Bajrang Sonavane : ….यामुळे याचा अर्थ काय ? खासदार बजरंग सोनवणे यांनी केली ‘ही’ मागणी ; म्हणाले तपास हा……

नवी दिल्लीः सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणानंतर राजकीय नेत्यांनी मस्साजोग या गावात जात देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेट घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात वाल्मीक कराडची देखील गाडी होती, असा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. जी गाडी त्या ताफ्यात होती, त्याच गाडीतून कराड सीआयडी कार्यालयात हजर झाला, असं देखील म्हणाले. यामुळे याचा अर्थ काय ? आणि ही गाडी कोणाच्या नावावर आहे, याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी सोनवणे यांनी केली.
या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत सोनवणे म्हणाले, जे तीन मुख्य आरोपी आहेत त्यांना अद्यापर्यंत अटक केलेली नाही. सीआयडीचा तपास पारदर्शक व्हावा, ही अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. परळी येथून पुणे आणि त्यानंतर गोवा परत पुणे असा वाल्मीक कराडचा प्रवास सुरू होता. १५ डिसेंबरच्या कार्यक्रमाला देखील कराड उपस्थित होता, असा देखील दावा सोनवणे यांनी केला आहे. यामुळे गुन्हा दाखल होताच लगेच कारवाई झाली असती, तर हे सगळे घडले नसते. असे देखील ते म्हणाले.
सोनवणे यांचे मुंडेंना उत्तर
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची आणि सीआयडीची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केली आहे, तुम्ही नाही. असे उत्तर मंत्री धनंजय मुंडे यांनी खा. बजरंग सोनवणे यांनी दिलं आहे.





