काय सांगता! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 42 जुळ्या बाळांचा जन्म; कारण काय?

Bead News : खरंतर बीड जिल्हा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. आता बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळचं कारण जरा वेगळचं आहे. हे कारण तुम्ही ऐकूण आश्चर्यचकित व्हाल. बीड जिल्ह्यातील रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यात तब्बल 42 जुळ्या मुलांना जन्म झाला आहे. मात्र, इतक्या प्रमाणात जुळी बाळ जन्माला कशी आली? यांचं कारणंही समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्हा रुग्णालयामध्ये जुळी मुलं जन्माला येण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पूर्वी क्वचितच दिसणाऱ्या जुळ्या आणि तिळ्या मुलांचे जन्माला होत असे. सध्या वाढत्या जुळ्या बाळांचा जन्माचे कारण म्हणजे कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञान आणि अनुवंशिकता असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितलं आहे. बीड जिल्हा रुग्णालयात गेल्या नऊ महिन्यांपासून जन्म झालेल्या बालकांच्या संख्येवरून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही वाढती आकडेवारी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच आकडेवारी चर्चेचा विषय देखील ठरत आहे.
या 42 जुळ्या बालकांमध्ये काहीं बाळांची प्रसुती ही सिजर पद्धतीने तर काहींची नार्मल पद्धतीने झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये रुग्णालय देखील खबरादारीचे उपाय घेताना दिसत आहे. या बालकांचे वजन कमी भरते. म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जाते. डॉक्टरांचा सल्ला, लसीकरण आदी महत्वाची बाबी अत्यंत महत्वाच्या असतात.





