बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं? जाणून घ्या

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. या बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळालं?
विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
MUTP-3 : 908 कोटी
मुंबई मेट्रो: 1087 कोटी
दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
नागपूर मेट्रो: 683 कोटी
नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
पुणे मेट्रो: 814 कोटी
मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी
‘या’ गोष्टी होणार स्वस्त
सोन्यांसह मोबाईल, चार्जर,इलेक्ट्रिक वाहने, सोलार, मासे अन्न, चामड्याच्या वस्तू, रासायनिक पेट्रोकेमिकल, पीव्हीसी फ्लेक्स बॅनर अशा अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत. सीतारामण यांनी मोबाईल आणि चार्जरवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली. सोने आणि चांदीवरील सीमाशुल्कात 6 टक्क्यांची तर प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात 6.4 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्यामुळे हे दागिनेही स्वस्त झाले आहेत. तसेच कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ही औषधेदेखील स्वस्त होणार आहेत.
‘या’ गोष्टी झाल्या महाग
टेलिकॉम उपकरणे महाग झाली आहेत, त्यावरील कस्टम ड्युटी 15% करण्यात आली आहे.प्लास्टिक महाग होणार आहे. टेलिकॉम उपकरणांवरील कस्टम ड्युटी 15 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्टॉक मार्केटमधून इन्कम होणाऱ्यांना वेगळा टॅक्स भरावा लागणार आहे. त्यावरील करदेखील वाढवण्यात आला आहे.





