Neha Dhupia : मातृत्वानंतर नेहा धुपियामध्ये काय बदल झाला? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा म्हणाली…
Neha Dhupia : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाचा खुलासा केला.

Neha Dhupia : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) ‘MTV Roadies’ या रिॲलिटी शोमध्ये गँग लीडर म्हणून दिसते. या शोमध्ये ती परीक्षक आणि गँग लीडर अशा दोन्ही भूमिका बजावत असून, तिची स्पष्टवक्ती शैली आणि स्पर्धकांना हाताळण्याची पद्धत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचा ‘No Filter Neha’ हा सेलिब्रिटी टॉक शो देखील प्रसिद्ध आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत महत्वाचा खुलासा केला. आई झाल्यानंतर तिच्या स्वभावात बदल झाल्याचे तिने सांगितले. मुलाखतीत तिला आई झाल्यानंतर आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात काही बदल झाला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर तिने स्पष्टपणे सांगितले की, “आई झाल्यानंतर तरुण स्पर्धकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलला असला, तरी गँग लीडर म्हणून तिची भूमिका आणि निर्णय घेण्याची पद्धत आजही तशीच आहे. शोमध्ये तिचे निर्णयच महत्त्वाचे असतात आणि ती आपल्या भूमिकेवर ठाम असते.” 
स्पर्धकांच्या भावनिक कहाण्यांचा नेहावर होतो का परिणाम? (Neha Dhupia)
नेहाने स्पर्धकांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही भाष्य केले. काही स्पर्धकांचे बालपण इतरांच्या तुलनेत अधिक कठीण गेले आहे. त्यामुळे अशा स्पर्धकांबद्दल तिच्या मनात विशेष सहानुभूती असल्याचे तिने सांगितले. मात्र, एखाद्या स्पर्धकाने आपली दुःखद कहाणी सांगितली म्हणून ती लगेच भावनावश होत नाही, असेही बोलताने नेहाने स्पष्ट केले.
वरून कणखर, पण मनाने हळवी!
नेहा धुपिया ही तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि कणखर स्वभावासाठी ओळखली जाते. मात्र, तिच्या या व्यक्तिमत्त्वामागे एक संवेदनशील बाजूही आहे. ती खूप हळवी देखील आहे, त्याबद्दल अनेकांना माहिती नाही.





